ETV Bharat / bharat

VIDEO : भरधाव चारचाकीने युवकाला उडवले, युवक जागीच ठार - गाजियाबाद क्राइम बातमी

लोनीच्या सिरोली भागात एका चारचाकी वाहनाच्या धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेचा व्हिडिओ समोर आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

CCTV
घटनास्थळावरील छायाचित्र
author img

By

Published : Jun 8, 2020, 11:35 AM IST

गाजियाबाद (उत्तरप्रदेश) - लोनीच्या सिरोली भागात एका चारचाकी वाहनाच्या धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. वाहनचालक वेगात आपले वाहन चालवत येतो आणि रस्त्याच्या बाजूने चालणाऱ्या एका युवकाला जोरदार ठोकर देत गाडीसह घटनास्थळावरून पसार झाला. पोलीस चालकाचा शोध घेत असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

घटनास्थळावरील दृश्य

व्हिडिओतील जो घटनास्थळ आहे तो खूप लहान रस्ता आहे. या लहानशा रस्त्यावर चारचाकी वाहन प्रचंड वेगाने तो चालक चालवत होता. याचवेळी रस्त्याने चालणाऱ्या एका युवकाला त्याने टक्कर दिली. यात तो युवक काही फुट वर उडून त्याचे डोके जवळ असलेल्या भींतीवर आदळले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा - कोरोनाशी लढा... फिजिकल डिस्टेन्सिंग ठेवायला सांगतोय अलवरच्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा रोबो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.