नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना शहरातील एम्स(AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वासनाचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले आहे. छातीत संसर्गाची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
याआधी देखील त्यांना अशा प्रकारचा त्रास झाला होता. तसेच अमित शाह यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, चाचणी निगेटिव्ह आल्याने डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला. आज पुन्हा श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टर त्यांनी तपासणी करत असून प्रकृती स्थिर असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...)