लखनऊ (उत्तरप्रदेश) - विविधतेने नटलेला देश, अशी भारताची ओळख आहे. एकीकडे देशात काही राजकारण्यांकडून जातिपातिचे राजकारण केले जाते. मात्र, देशात आजही अशी अनेक उदाहरणे पहायला मिळतात. ज्यातून सर्वधर्म समभाव असल्याचे दर्शन घटते. शनिवारी (दि. 3 ऑक्टोबर) उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे.
![देणगीची पावती](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/up-luc-02-hindu-man-donates-money-for-mosque-image-10058_03102020184740_0310f_1601731060_555.jpg)
सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानुसार अयोध्येत मशिदीसाठी पाच एकर जमीन मिळाली आहे. या जमिनीवर मशीद आणि रुग्णालय निर्माण करण्याचा निर्णय सुन्नी वक्फ बोर्डने घेतला आहे. यासाठी इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन नावाची ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेला पहिली देणगी एका हिंदू व्यक्तीने दिल्याने त्याचे कौतूक होत आहे.
ट्रस्टकडून मशीद व रुग्णालयासाठी देणगी गोळा करण्यात येत आहे. शनिवारी मशिदीसाठी ट्रस्टला पहली देणगी प्राप्त झाली. ही देणगी देणारी व्यक्ती मुस्लीम नसून ती एक हिंदू व्यक्ती आहे. रोहीत श्रीवास्तव, असे त्या व्यक्तीचे नावे असून ते लखनऊ विद्यापिठातील विधी विभागाचे कर्मचारी आहेत. त्यांनी शनिवारी लखनऊच्या इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनच्या कार्यालयात जाऊन 21 हजार रुपयांचा धनादेश दिला आहे. यावेळी इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनचे सचिव आणि प्रवक्ता अतहर हुसैन व विश्वस्त मोहम्मद राशीद उपस्थित होते. अतहर हुसैन यांनी आनंद व्यक्त करत जातिय सलोखा राखण्याचे काम रोहीतने केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - हाथरस प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मागणी