ETV Bharat / bharat

हिमाचल प्रदेश-उत्तराखंडमधील शिक्षण संस्था सोमवारी बंद; मुसळधार पावसाच्या शक्यतेने प्रशासनाचा निर्णय

author img

By

Published : Aug 18, 2019, 9:16 PM IST

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील अंगणवाडी तसेच सर्व शिक्षण संस्थांना एकदिवसाची सुट्टी देण्यात आली आहे. तसेच पावसाचा जोर कायम राहिल्यास अजून काही दिवस शिक्षण संस्था बंद राहण्याची शक्यता आहे.

शिक्षण संस्था

नवी दिल्ली - हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांत काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. जोरदार पावसामुळे अनेक जिल्ह्यातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशातील शिमला आणि कुल्लू या जिल्ह्यातील सरकारी, गैर सरकारी शाळा आणि महाविद्यालयांना 19 ऑगस्टला सुट्टी देण्यात आली आहे. तसेच उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यामध्येही शिक्षण संस्थांना एकदिवसाची सुट्टी देण्यात आली आहे.

  • Office of the District Magistrate, Kullu: Due to heavy rains & incidents of landslides in the region, all private & government educational institutions in the district will remain closed on 19 August. #HimachalPradesh pic.twitter.com/4P8NOcXV57

    — ANI (@ANI) August 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज्यात पावसाचा जोर वाढला असून निर्माण होणारा धोका लक्षात घेत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी तसेच सर्व शिक्षण संस्थांना एकदिवसाची सुट्टी देण्यात आली आहे. तसेच पावसाचा जोर कायम राहिल्यास अजून काही दिवस शिक्षण संस्था बंद राहण्याची शक्यता आहे.

शनिवारपासून राज्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले असून धोका वाढला आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.