ETV Bharat / bharat

लॉकडाऊन : चंडीगडमध्ये अडकलेल्यांना परत आणण्यासाठी हिमाचल सरकारचा पुढाकार - Lockdown

लॉकडाऊनमुळे दुसऱ्या राज्यात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यास सशर्त परवानगी केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश सरकारने पंजाबच्या चंडीगड येथे अडकलेल्या नागरिक आणि विद्यार्थ्यांना परत आणण्याची व्यवस्था केली आहे.

Bus
बस
author img

By

Published : May 3, 2020, 12:51 PM IST

चंडीगड - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता देशात तिसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. मात्र, त्या अगोदर लॉकडाऊनमुळे दुसऱ्या राज्यात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यास सशर्त परवानगी केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश सरकारने पंजाबच्या चंडीगड येथे अडकलेल्या नागरिक आणि विद्यार्थ्यांना परत आणण्याची व्यवस्था केली आहे.

लॉकडाऊनमुळे चंडीगडमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणतेय हिमाचल सरकार

हिमाचल भवन प्रशासनाच्यावतीने ३ मे ला चार जिल्ह्यांतील नागरिकांसाठी बसची व्यवस्था करण्यात आल्याची सूचना अगोदरच अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहचवण्यात आल्या होत्या. त्यानुसार पहिल्या टप्प्यात चार जिल्ह्यांतील नागरिकांना हिमाचल प्रदेशमध्ये परत नेण्यात आले.

कांगडा, चंबा, ऊना आणि हमीरपूर येथील एक हजारपेक्षा जास्त नागरिकांना हिमाचलमध्ये परत आणण्यात आले. यामध्ये अगोदर विद्यार्थी, महिला आणि नंतर पुरुषांना पाठवण्यात आले. प्रत्येक व्यक्तिची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना बसमध्ये बसवण्यात येत असून बसमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत आहे.

यावेळी चंडीगड पोलिसांनी नागरिकांवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले. मागील एक महिन्यापासून हजारो नागरिक चंडीगडमध्ये अडकून पडले होते. यानंतर ४ आणि ५ मे ला दुसऱया आणि तिसऱया टप्प्यात नागरिकांना हिमाचलमध्ये परत नेण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.