शिमला : हिमाचल प्रदेशच्या भाजप आयटी सेलने शिवसेना नेते संजय राऊतांविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. संजय राऊत यांनी कंगना रणौत विरोधात अपशब्दांचा वापर केला होता. हे निंदनीय आहे म्हणत, आयटी सेलने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी आयटी सेलने शिमलाच्या पोलीस अधीक्षकांकडे पत्र देत, राऊतांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. आयटी सेलचे संयोजक चेतन बरागटा यांनी याबाबत माहिती दिली. हिमाचलची कन्या कंगना रणौत हिच्याविरोधात केलेली टीका आपण सहन करणार नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.
शिवसेना नेते संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्यामधील ट्विटर वॉर, आणि त्यानंतर कंगनाच्या घरावर झालेली कारवाई यामुळे सध्या दोघांदरम्यानचे वातावरण चांगलेच तापले आहे. कंगनाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलिसांच्या कार्यावर अविश्वास व्यक्त करत मुंबला पाकव्याप्त काश्मीर म्हटले होते. त्यानंतर हा वाद सुरू झाला होता.
हेही वाचा : कंगना रणौत घेणार राज्यपाल कोश्यारींची भेट