नवी दिल्ली - भारताच्या गुप्तचर विभागाकडून स्वतंत्रता दिवसाच्या पार्श्वभूमीवरून दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता दर्शवली आहे. गुप्तचर विभागाकूडन देण्यात आलेल्या माहितीनुसार कारमधून येऊन दहशतवादी राजधानी बाजारला निशाणा करू शकतात. यामुळे कनॉट प्लेस परिसरात बुलेप्रुफ वाहनासह स्वाट कमांडो पथक तैनात करण्यात आले आहे. हे पथक संशयित वाहनांची तपासणी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार कनॉट प्लेस येथे दिल्लीतील नागरिकांसह पर्यटकांचीही मोठी गर्दी असते. या ठिकाणी दररोज बाजार भरतो तसेच येथील बागेत भ्रमंती करण्यासाठी हजारो नागरिक येत असतात. सण २००६ साली कनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्क तसेच बराखंबा रोडवर स्फोट करण्यात आला होता. यंदा गुप्तचर विभागाकडून पून्हा या ठिकाणी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता दर्शवली आहे.
बुलेटप्रूफ गाडीमध्ये कमांडो तैनात
कनॉट प्लेस परिसर सुरक्षेच्या दृष्टिने महत्वपूर्ण आहे. यामुळे येथे स्वाट कमांडो पथकासह बुलेटप्रूफ गाडीतून गस्त घालत आहे. या ४ से ५ कमांडों अत्याधुनिक शस्त्रांसह तैनात आहेत. त्याचबरोबर पराक्रम व्हॅनमध्येही दिल्ली पोलीसचे कमांडो पथक तैनात आहेत.
वाहनांची होत आहे तपासणी
कनॉट प्लेसच्या इनर सर्कल येथे पोलीस पथक त्या ठिकाणाहून जाणाऱ्या गाड्यांची तपासणी करत आहेत. गाड्यांच्या तपासणीसह त्यांचे कागदपत्रांचीही तपासणी केली जात आहे. परिसरातील दुकानदारांनाही सावध राहण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.