नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भाजपच्या दिवंगत माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या 68 व्या जन्मदिनानिमित्त ट्विट करत त्यांना आदरांजली वाहिली. 'त्यांची असामान्य दूरदृष्टी नेहमीच प्रेरणा देत राहील', असे ट्विट जयशंकर यांनी केले आहे. 14 फेब्रुवारी 1952 ला सुषमाजींचा जन्म झाला होता. 6 ऑगस्ट 2019 ला त्यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
-
Remember Sushma Swaraj, today more than ever. Her warmth, dedication and vision will always inspire us.@MEAIndia pic.twitter.com/hhG3Sr0T0j
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) February 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Remember Sushma Swaraj, today more than ever. Her warmth, dedication and vision will always inspire us.@MEAIndia pic.twitter.com/hhG3Sr0T0j
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) February 14, 2020Remember Sushma Swaraj, today more than ever. Her warmth, dedication and vision will always inspire us.@MEAIndia pic.twitter.com/hhG3Sr0T0j
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) February 14, 2020
सुषमा स्वराज भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या देशाच्या दुसऱ्या महिला पराराष्ट्र मंत्री होत्या. मृत्यूपूर्वी बऱ्याच काळापासून त्यांना प्रकृती अस्वास्थ्याने घेरले होते. यामुळे त्यांनी 2019ची लोकसभा निवडणूक लढवत नसल्याचे भाजप अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळवले होते.
ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स, तातडीने प्रतिसाद आणि मदतीसाठी नेहमी तत्पर परराष्ट्र मंत्री
सुषमाजी यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने गुरुवारी 'प्रवासी भारतीय केंद्र' आणि 'परराष्ट्र सेवा संस्था' यांचे त्यांच्या नावावरून नामकरण केले. सुषमाजी यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून भारतासाठी मुत्सद्दीपणे धोरणे आखतानाच दुर्मिळ सहानुभूती आणि मानवी दृष्टिकोन बाळगणार्या नेतृत्वाचे दर्शन घडवले होते. जगभरात ट्विटरवरून सर्वाधिक फॉलोअर्स मिळालेल्या त्या एकमेव परराष्ट्र मंत्री ठरल्या. भारताबाहेरील भारतीयांना तातडीने प्रतिसाद देणाऱ्या आणि मदतीसाठी नेहमी तत्पर असणाऱ्या परराष्ट्र मंत्री म्हणून त्या प्रसिद्ध होत्या.
अखेरचे ट्विट
5 ऑगस्ट 2019 ला जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल 370 रद्द करण्यात आले. यानंतर सुषमाजी यांनी 'या क्षणाची आयुष्यभर वाट पहात असल्याचे' ट्विट केले होते. तसेच, या निर्णयासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदनही केले होते. हे त्यांचे अखेरचे ट्विट ठरले.
-
प्रधान मंत्री जी - आपका हार्दिक अभिनन्दन. मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी. @narendramodi ji - Thank you Prime Minister. Thank you very much. I was waiting to see this day in my lifetime.
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) August 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">प्रधान मंत्री जी - आपका हार्दिक अभिनन्दन. मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी. @narendramodi ji - Thank you Prime Minister. Thank you very much. I was waiting to see this day in my lifetime.
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) August 6, 2019प्रधान मंत्री जी - आपका हार्दिक अभिनन्दन. मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी. @narendramodi ji - Thank you Prime Minister. Thank you very much. I was waiting to see this day in my lifetime.
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) August 6, 2019
सुषमाजींच्या अचानक जाण्याने अनेकांना चटका
सुषमाजींचे अचानकपणे निघून जाणे अनेकांना चटका लावून गेले. त्यांच्या अंत्यसंस्कारांवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते. तर, हेरगिरीच्या संशयावरून पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या कुलभूषण जाधव यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला लढणारे वकील हरिष साळवे यांनीही सुषमाजींशी मृत्यूपूर्वी काही वेळ आधीच फोनवर बोलणे झाल्याचे सांगितले. आपली मोठी बहीण निघून गेल्याची भावना असल्याचे ते म्हणाले.