ETV Bharat / bharat

हेमंत सोरेन झारखंडचे ११ वे मुख्यमंत्री; शपथविधीला राहुल, ममता, स्टॅलीनसह दिग्गज नेते उपस्थित - हेमंत सोरेन शपथविधी सोहळा

हेमंत सोरेन यांनी झारखंडचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यावेळी देशभरातील दिग्गज नेते उपस्थित होते. सोरेन यांच्यासह ३ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

हेमंत सोरेन
हेमंत सोरेन
author img

By

Published : Dec 29, 2019, 7:57 AM IST

Updated : Dec 29, 2019, 3:40 PM IST

रांची - 'झारखंड मुक्ती मोर्चा'चे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी झारखंड राज्याचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून आज (रविवारी) शपथ घेतली. राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी सोरेन यांना शपथ दिली. सोरेन सरकारमध्ये तीन आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

काँग्रेसचे आमदार आलमगीर आलम आणि रामेश्वर उराव यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रीय जनता दल पक्षाचे आमदार सत्यानंद भोक्ता यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. हेमंत सोरेन दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद भूषवत आहेत. राहुल गांधी, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, अशोक गेहलोत, एम. के. स्टॅलिन, भूपेश बघेल, संजय सिंह यांच्यासह अनेक दिग्गज नेते शपतविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आपल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात सोरेन यांनी या कार्यक्रमाला 'संकल्प दिवस' असे म्हटले आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल हे पक्ष एकत्र लढले होते. यात ८१ पैकी ४७ जागा जिंकून त्यांनी आरामात बहुमत मिळवले, आणि भाजपला आणखी एका राज्यातून आपली सत्ता गमवावी लागली. या ४७ जागांपैकी झारखंड मुक्ती मोर्चाला ३०, काँग्रेसला १६ तर राजदला एक जागा मिळाली होती.

Intro:Body:

हरियाणाचे अकरावे मुख्यंमंत्री म्हणून हेमंत सोरेन घेणार आज शपथ!

रांची - झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन, हे आज (रविवार) झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. राज्याचे ते ११ वे मुख्यमंत्री असतील. मोराबादी मैदानावर आज दुपारी २ वाजता शपथविधी सोहळा पार पडेल. आपल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात त्यांनी या कार्यक्रमाला 'संकल्प दिवस' असे म्हटले आहे. झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू या मंत्रीमंडळाला शपथ देतील.

या सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, 'राजद' नेते तेजस्वी यादल, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि इतर नेते उपस्थित असणार आहेत.

सहा राज्यांचे मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित असतील. यामध्ये पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, मध्य प्रदेशचे कमल नाथ, राजस्थानचे अशोक गेहलोत, महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांचा समावेश आहे. यांसोबत एच. डी कुमारस्वामी, के. सी. वेणुगोपाल, एन. चंद्राबाबू नायडू, हरिश रावत, द्रमुकच्या खासदार कनिमोझी, टी. आर. बालू, शरद यादव आणि अहमद पटेल हे सर्व नेतेदेखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, आणि राष्ट्रीय जनता दल हे पक्ष एकत्र लढले होते. यात ८१ पैकी ४७ जागा जिंकून त्यांनी आरामात बहुमत मिळवले, आणि भाजपला आणखी एका राज्यातून आपली सत्ता गमवावी लागली. या ४७ जागांपैकी झारखंड मुक्ती मोर्चाला ३०, काँग्रेसला १६ तर राजदला एक जागा मिळाली होती.

Conclusion:
Last Updated : Dec 29, 2019, 3:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.