रांची (झारखंड)- भुकेने व्याकूळ झालेल्या रुग्णाने जमिनीवर पडलेले अन्न खाल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना राज्यातील सर्वात मोठे रुग्णालय रिम्स येथे घडली. रुग्णाला चालता येत नसल्याने नाईलाजाने त्याने जमिनीवर पडलेले अन्न खाल्ल्याचे समजले आहे. फिलिप असे या रुग्णाचे नाव आहे.
'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने जेव्हा फिलिपशी बोलण्याचा प्रयत्न केले, तेव्हा तो काहीही बोलण्याच्या अवस्थेत नव्हता. त्याचा चेहरा पाहून तो खूप दिवसांपासून उपाशी असल्याचे लक्षात आले. फिलिप बऱ्याच दिवसांपासून रिम्स रुग्णालयात उपाचार घेत होता. त्याच्या एका पायामध्ये रॉड घातल्याने त्याला चालता येत नव्हते. त्यामुळे, तो बाहेर जाऊन जेवण करू शकत नव्हता. दरम्यान, रुग्णालयाच्या बाहेर शासन आणि सामाजिक संघटनांकडून गोर-गरीबांना अन्न वाटप केले जात आहे. अशा वेळेस रुग्णालय प्रशासनाने रुग्णासाठी जेवनाची व्यवस्था करणे आवश्यक होते. मात्र, प्रशासनाने याबाबत काहीही केले नाही. त्यामुळे, गरीबांप्रति रुग्णालय प्रशासनाची असंवेदनशीलता दिसून आली आहे.
याबाबत जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली तेव्हा जाऊन अधिकाऱ्यांनी रुग्णासाठी जेवनाची व्यवस्था केली आणि रुग्णाला उत्तम उपाचार देण्यात येणार असल्याची ग्वाही दिली.
हेही वाचा- कोविड-19 ट्रॅकर : भारतामधील कोरोनाबाधित रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी