ETV Bharat / bharat

दिल्लीत पावसाची जोरदार हजेरी ; लोकांना उकाड्यापासून दिलासा

author img

By

Published : Jul 19, 2020, 1:34 PM IST

रविवारी सकाळी दिल्लीत पावसाने जोरदार हजेरी लावली. पाऊस सुरू राहिल्यामुळे लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. वातावरण थंड झालं आहे. मात्र, सखल भागात आणि रस्त्यांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीच्या हालचालीवर परिणाम झाला आहे.

दिल्ली पाऊस
दिल्ली पाऊस

नवी दिल्ली - दिल्लीत चांगला पाऊस न पडल्यामुळे उन्हाचा उद्रेक झाला होता. रविवारी सकाळी दिल्लीत पावसाने जोरदार हजेरी लावली. पाऊस सुरू राहिल्यामुळे लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. सफदरजंगमध्ये 4.9 मिमी पावसाची नोंद झाली. दिल्ली-एनसीआरच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाल्याचे आयएमडीच्या प्रादेशिक पूर्वानुमान केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी सांगतिले.

राजधानी दिल्लीत पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली असून त्यामुळे वातावरण थंड झालं आहे. मात्र, सखल भागात आणि रस्त्यांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीच्या हालचालीवर परिणाम झाला आहे. सफदरजंगमध्ये जुलै महिन्यापर्यंत 47.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जी दरवर्षीच्या 109.4 मिमीच्या सरासरीपेक्षा 56 टक्क्यांनी कमी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.