ETV Bharat / bharat

गोव्यात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड, रस्त्यांवर साचले तळे - rain

राज्यात तब्बल दोन आठवडे उशिराने मान्सून दाखल झाला. सुरवातीला म्हणावा तसा मान्सून सक्रीय झाला नव्हता. असे वाटत असतानाच बुधवारी सकाळपासून झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली.

घरावर झाड कोसळले
author img

By

Published : Jun 26, 2019, 10:08 PM IST

पणजी - गोव्यात आज (बुधवारी) पहाटे मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पडझड झाली. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. तसेच अनेक ठिकाणी संरक्षक भिंती कोसळल्या.

घरावर झाड कोसळले

राज्यात तब्बल दोन आठवडे उशिराने मान्सून दाखल झाला. सुरुवातीला म्हणावा तसा मान्सून सक्रीय झाला नव्हता, असे वाटत असतानाच बुधवारी सकाळपासून झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. तर काही ठिकाणी संरक्षक भिंत कोसळल्या. गटारे तुंबून रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे वाहनचालकांना त्रास झाला.

पणजी अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी पणजीतील इमेक्यूलेट चर्च परिसरात एका उभ्या असलेल्या महागड्या गाडीवर संरक्षक भिंत कोसळून सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले. मात्र, अन्यत्र अशी नुकसानीची घटना घडली नाही. काही ठिकाणी वीजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. तर मळा येथे एक झाड घरावर कोसळले. मात्र, यामध्ये मोठे नुकसान झाले नाही.

पहिल्याच पावसात राजधानी पणजीतील अनेक ठिकाणी रस्त्यांचे डांबर उखडून खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. तसेच रस्त्यावर खडी पसरली होती. पावसाळा सुरू होताना रस्त्यांची ही अवस्था असेल तर पुढे काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Intro:पणजी : आज पहाटे पासून सुरु झालेल्या पावसामुळे गोव्यात अनेक ठिकाणी पडझड झाली. तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Body:तब्बल दोन आठवडे उशिरा दाखल होऊन मान्सून म्हणावा तसा सक्रीय झालेला नाही, असे वाटत असतानाच बुधवारी सकाळपासून हजेरी लावलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली तर काही संरक्षक भिंत कोसळल्या. गटारे तुंबून रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे वाहनचालकांना त्रासदायक ठरत होते.
पणजी अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी पणजीतील इमेक्यूलेट चर्च परिसरात एका उभ्या असलेल्या महागड्या गाडीवर संरक्षक भिंत कोसळून सुमारे 30 लाखांचे नुकसान झाले. मात्र, अन्यत्र अशी नुकसानीची घटना घडली नाही. काही ठिकाणी वीजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. तर मळा येथे एक झाड घरावर कोसळले. मात्र, यामध्ये मोठे नुकसान झाले नाही.
पहिल्याच पावसात राजधानी पणजीतील अनेक ठिकाणी रस्त्यांचे डांबर उखडून खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. तसेच रस्त्यावर खडी पसरली होती. पावसाळा सुरू होताना रस्त्यांची ही अवस्था असेल तर पुढे काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.