रांची - राज्याच्या दुमका जिल्ह्यामध्ये ६ फेब्रुवारीला एका चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने २५ दिवसांच्या आत तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा आणि अपर सत्र न्यायाधीश मो. तौफीकुल हसन यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रामगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये, गेल्या महिन्यात सहा तारखेला, एक लहान मुलगी जत्रेमध्ये गेली होती. तिथून ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेणे सुरू केले असता, त्यांना तिचा मृतदेह एका खड्ड्यामध्ये आढळून आला. याप्रकरणी सात फेब्रुवारीला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस तपासात हे समोर आले, की या चिमुरडीवर सामूहिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आहे. तसेच, मुलीचे चुलते आणि त्याच्या दोन मित्रांनीच हे दुष्कृत्य केल्याचेही पोलीस तपासात स्पष्ट झाले.
२८ फेब्रुवारीला न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू झाली. त्यानंतर मंगळवारी, म्हणजे अवघ्या चार दिवसांमध्ये न्यायाधीशांनी तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.
हेही वाचा : हैदराबादमध्ये तीन कोरोना विषाणू संशयित; विशेष रुग्णालयाची स्थापना