ETV Bharat / bharat

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटात ठार झालेल्या नेत्यांना देवेगौडा, कुमारस्वामींनी वाहिली श्रद्धांजली

author img

By

Published : Apr 24, 2019, 6:14 PM IST

इसिसने श्रीलंकेत केलेल्या बॉम्बहल्ल्यात जेडीएसचे दोन नेते ठार झाले. या नेत्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी श्रद्धांजली अर्पण केली

बॉम्बस्फोटाचे घटनास्थळ

बंगळुरू - रविवारी श्रीलंकेत इसिसने केलेल्या बॉम्बहल्ल्यात जेडीएसचे दोन नेते ठार झाले. या नेत्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

श्रीलंकेतील कोलंबो, नेगोम्बो, कोच्चीकेडे, बॅटीकालोआ या परिसरात रविवारी दहशतवाद्यांनी बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात जेडीएस नेते के. जी. हनुमंतरयप्पा आणि एम. रंगप्पा ठार झाले. त्यामुळे भारतातही शोक व्यक्त करण्यात येत आहे.

कुमारस्वामी यांनी सोमवारी याबाबत ट्विट करत श्रद्धांजली वाहिली. यावेळी ते म्हणाले, की बॉम्बहल्ला झाल्यानंतर जेडीएसच्या पदाधिकाऱ्यांचे पथक गायब झाल्याने धक्का बसला. त्यापैकी के. जी. हनुमंतरयप्पा आणि एम. रंगप्पा हे दोघे ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मी याबाबत कोलंबोतील भारतीय दुतावासाच्या संपर्कात आहे, असेही त्यांनी ट्विट केले.

कोलंबोत झालेल्या बॉम्बहल्ल्यात भारतातील जेडीएसचे के. जी. हनुमंतरयप्पा आणि एम. रंगप्पा ठार झाल्याची माहिती देणारे ट्विट श्रीलंकेतील भारतीय दुतावासाने केले आहे.

Intro:Body:

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटात ठार झालेल्या नेत्यांना देवेगौडा, कुमारस्वामींनी वाहिली श्रद्धांजली

बंगरुळू - रविवारी श्रीलंकेत इसिसने केलेल्या बॉम्बहल्ल्यात जेडीएसचे दोन नेते ठार झाले. या नेत्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

श्रीलंकेतील कोलंबो, नेगोम्बो, कोच्चीकेडे, बॅटीकालोआ या परिसरात रविवारी दहशतवाद्यांनी बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात जेडीएस नेते के. जी. हनुमंतरयप्पा आणि एम. रंगप्पा ठार झाले. त्यामुळे भारतातही शोक व्यक्त करण्यात येत आहे.

कुमारस्वामी यांनी सोमवारी याबाबत ट्विट करत श्रद्धांजली वाहिली. यावेळी ते म्हणाले, की बॉम्बहल्ला झाल्यानंतर जेडीएसच्या पदाधिकाऱ्यांचे पथक गायब झाल्याने धक्का बसला. त्यापैकी के. जी. हनुमंतरयप्पा आणि एम. रंगप्पा हे दोघे ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मी याबाबत कोलंबोतील भारतीय दुतावासाच्या संपर्कात आहे, असेही त्यांनी ट्विट केले.

कोलंबोत झालेल्या बॉम्बहल्ल्यात भारतातील जेडीएसचे के. जी. हनुमंतरयप्पा आणि एम. रंगप्पा ठार झाल्याची माहिती देणारे ट्विट श्रीलंकेतील भारतीय दुतावासाने केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.