ETV Bharat / bharat

बांगड्या घालण्यास अन् सिंदूर लावण्यास पत्नीचा नकार....वाद पोहोचला उच्च न्यायालयात

पतीने या प्रकरणी आधी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, पत्नीकडून पतीला क्रूर वागणूक मिळाली नसल्याचे म्हणत कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोट नाकारला होता.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jun 30, 2020, 3:42 PM IST

गुवाहटी - हिंदू संस्कृतीतल्या प्रथेनुसार पत्नी राहत नसल्याने आसाममधील एका व्यक्तीने पत्नीला घटस्फोट मागितला होता. याप्रकरणी गुवाहटी उच्च न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला आहे. बांगड्या घालण्यास आणि सिंदूर लावण्यास पत्नीने नकार दिला होता. त्यानंतर हा वाद उच्च न्यायालयात पोहचला.

पतीने आधी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, पत्नीकडून पतीला क्रूर वागणूक मिळाली नसल्याचे म्हणत कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोट नाकारला होता. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. मुख्यन्यायाधीश अजय लांबा आणि न्यायमूर्ती सौमित्रा शाकिया यांनी कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय रद्द करत जोडप्याला घटस्फोट मंजूर केला आहे.

बांगड्या आणि सिंदूर न लावल्याने पत्नी अविवाहीत असल्याचे दर्शवते. तसेच तिला लग्न मंजूर नाही हे सुद्धा यातून सुचित होते. पत्नीच्या वागणूकीतून असे दिसून येते की, तिला पतीबरोबर वैवाहिक जीवन व्यतीत करण्याची इच्छा नाही, असे मत न्यायालयाने निर्णय देताना मांडले.

या जोडप्याचा विवाह 17 फेब्रुवारी 2012 साली झाला होता. मात्र, त्यांच्यामध्ये कायम वाद होत होते. त्यामुळे 2013 सालापासून ते विभक्त राहत होते. सासरकडील लोकांनी छळ केल्याचा आरोपही महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला होता.

पतीच्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घेण्यासही पत्नी विरोध करत होती. हे कृत्य 'मेन्टनन्स अ‌ॅड वेलफेअर ऑफ पेरन्ट्स अ‌ॅड सिनियर सिटिझन अ‌ॅक्ट 2007' च्या विरोधात आहे, याकडे कौटुंबिक न्यायालयाने दुर्लक्ष केले होते, असे न्यायालयात पतीची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सांगितले. पत्नीच्या क्रूर वागणूकीसाठी एवढा पुरावाही पर्याप्त होता असेही ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.