ETV Bharat / bharat

डान्सर सपना चौधरी अखेर भाजपमध्ये

काही महिन्यांपूर्वीही सपना चौधरी भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा होती. मात्र, स्वतः सपना चौधरीने राजकारणात येण्याचा विचार नसल्याचे सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला होता.

author img

By

Published : Jul 7, 2019, 12:20 PM IST

डान्सर सपना चौधरी अखेर भाजपमध्ये

नवी दिल्ली - हरयाणवी लोकगायिका आणि डान्सर सपना चौधरीने रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीतील जवाहर लाल नेहरू स्टेडियममध्ये भाजप सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सपना चौधरीने भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान, भाजपचे महासचिव रामलाल आणि मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत सपना चौधरीने भाजपमध्ये प्रवेश केला.

डान्सर सपना चौधरी अखेर भाजपमध्ये
डान्सर सपना चौधरी अखेर भाजपमध्ये

काही महिन्यांपूर्वीही सपना चौधरी भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा होती. मात्र, स्वतः सपना चौधरीने राजकारणात येण्याचा विचार नसल्याचे सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला होता. परंतु आज रविवारी सपना चौधरीने भाजपमध्ये प्रवेश करत राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे सांगितले आहे.

सध्या संपूर्ण देशात भाजपतर्फे सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. या कायक्रमांतर्गत अनेक नागरिकांना भाजपमध्ये सहभागी करून घेतले जात आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूकीवेळी सपना चौधरी काँग्रेसमध्येही प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. काँग्रेसकडून तिला तिकीट मिळणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, स्वतः सपनानेच या सगळ्या अफवा असल्याचे सांगत काँग्रेस प्रवेशाचे वृत्त फेटाळून लावले होते. त्यानंतर तिने आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.