अंबाला - वल्लभगड येथे झालेल्या हत्याकांडनंतर आता हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी कठोर पावले उचलली आहेत. अनिल विज यांनी याप्रकरणी तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. लव्ह जिहादच्या दृष्टिकोनातून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. हरयाणामध्ये गुंडाराज चालू देणार नाही, अस सांगत विज यांनी याप्रकरणाचा 2018 पासून सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तर मुलीच्या कुटुंबीयांनी आपली तक्रार मागे घेतली आहे.
कॉंग्रेस नेत्यांचा हात
या प्रकरणाचा तपास करताना लव्ह जिहादचे हे प्रकरण आहे का, याची पडताळणी करावी तसेच अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाही, असे कडक आदेशही दिले आहेत. याप्रकरणातील आरोपींशी संबधित कॉंग्रेस नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण 2018मध्ये कुटुंबाला तक्रार मागे घेण्यासाठी भाग पाडण्यात या नेत्यांचांच हात असण्याची शक्यता विज यांना वाटत आहे.
हेही वाचा - एक महिन्याच्या तान्ह्या बाळाची पैशांसाठी विक्री, ओडिशातील धक्कादायक प्रकार
घटनाक्रम
सोमवारी निकिता परीक्षा देऊन घरी जात असताना आरोपी तौसीफने गोळ्या घालून तिची हत्या केली. आरोपीने या तरुणीला आधी गाडीमध्ये बसवून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने याला विरोध केल्याने या तरुणाने तिच्यावर गोळीबार केला, ज्यात तिचा मृत्यू झाला. मंगळवारी तौसीफ आणि त्याचा साथीदार रेहान याला अटक करण्यात आली. तर या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.