चंढीगड - यूटी गेस्ट हाऊसमध्ये भाजप पक्षाची विधीमंडळ बैठक पार पडली असून, या बैठकीत खट्टर यांची पुन्हा विधानसभेचे गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. काही वेळातच खट्टर राज्यपाल यांची भेट घेणार असून याभेटीदरम्यान ते सत्तास्थापनेचा दावा करतील, असे समजते. तर दुसरीकडे जेजेपीचे नेते दुष्यंत चौटाला आपल्या आमदारांच्या पाठिंबा असणारे पत्र राज्यपाल यांना देणार आहेत.
-
Chandigarh: Manohar Lal Khattar has been elected BJP's legislative party leader. #Haryana pic.twitter.com/R1DPhZTKvL
— ANI (@ANI) October 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Chandigarh: Manohar Lal Khattar has been elected BJP's legislative party leader. #Haryana pic.twitter.com/R1DPhZTKvL
— ANI (@ANI) October 26, 2019Chandigarh: Manohar Lal Khattar has been elected BJP's legislative party leader. #Haryana pic.twitter.com/R1DPhZTKvL
— ANI (@ANI) October 26, 2019
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, उद्या (२७ ऑक्टोबर) रविवारी २ वाजता भाजप सत्ता स्थापन करणार असून शपथविधी प्रक्रिया उद्याच पार पडणार आहे. याची तयारी हरियाणा विधानसभेत सुरू करण्यात आली आहे.
शुक्रवारी भाजपने जेजेपीसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याचाच भाग म्हणून आज भाजप आणि जेजेपीच्या आमदारांची संयुक्त बैठक होणार आहे. महत्वाचे म्हणजे, या बैठकीत अपक्ष आमदारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हरियाणा विधानसभेच्या ९० जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात भाजपचे ४०, काँग्रेस ३१, जेजेपी १०, आणि इतर अपक्ष ९ उमेदवार निवडणूक आले. भाजप जरी मोठा पक्ष राहिला असला तरी त्यांना मित्रपक्ष म्हणून जेजेपीची साथ घ्यावी लागली.
हेही वाचा - ठरलं..! हरियाणामध्ये जेजेपी-भाजप युतीचं होणार सरकार, भाजपचा मुख्यमंत्री तर जेजीपीचा उपमुख्यमंत्री
हेही वाचा - महाराष्ट्रात महायुतीच्या सत्तेत आम्हाला कॅबिनेट पद हवं; आठवलेंची मागणी