ETV Bharat / bharat

गुर्जर आंदोलन : 'या' रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल; महाराष्ट्रात येणाऱ्या गाड्यांचाही समावेश - Gurjar reservation movement latest news

गुर्जर आरक्षणाच्या समस्येवर तोडगा काढावा तसेच विविध मागण्यांसाठी गुर्जर समाजाच्यावतीने आज राजस्थानमध्ये आंदोलन सूरू आहे. आरक्षणासाठी रुळावर उतरलेला गुर्जर समाज आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाच्या मार्गावर आहे. गुर्जर नेते कर्नल किरोरी बैंसला यांचा मुलगा विजय बैंसला यांनी आजपासून चक्काजाम आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते.

kota railway station
कोटा रेल्वे स्थानक
author img

By

Published : Nov 1, 2020, 9:11 PM IST

कोटा (राजस्थान) - गुर्जर आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. यासोबतच कोटा रेल्वे मंडळातून जाणाऱ्या 12 हून अधिक रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, अशी माहिती कोटा मंडळाचे वरिष्ठ डीसीएम अजय पाल यांनी सांगितले. यात अनेक रेल्वे गाड्यांना कोट्याला आणले जाणार नाही. त्यांना इतर मार्गाने वळविण्यात येणार आहे. गुर्जर आरक्षणाच्या समस्येवर तोडगा काढावा तसेच विविध मागण्यांसाठी गुर्जर समाजाच्यावतीने आज राजस्थानमध्ये आंदोलन सूरू आहे. आरक्षणासाठी रुळावर उतरलेला गुर्जर समाज आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाच्या मार्गावर आहे. गुर्जर नेते कर्नल किरोरी बैंसला यांचा मुलगा विजय बैंसला यांनी आजपासून चक्काजाम आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते.

गुर्जर आरक्षण : 'या' रेल्वेगाड्यांचे वळविले मार्ग; महाराष्ट्रात येणाऱ्या रेल्वेचाही समावेश

अजय पाल म्हणाले की, काही आणखी रेल्वे आहेत, ज्यांना मार्ग बदलवत त्यांना कोटा येथून संचालित केले जाईल. याप्रकारामुळे अधिक वेळ जाणार आहे. तसेच प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. सोबतच कोटा रेल्वे मंडळ जेथून 20 प्रवासी रेल्वे गाड्या एका दिवसातून चालविल्या जात आहेत. यासोबतच 20हून अधिक फ्रेट रेल्वेही येथून जातात. या सर्वांना वळविण्याचे नियोजन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात येणाऱ्या 'या' रेल्वेचे बदलण्यात आले मार्ग -

  • 02952 दिल्ली-मुंबई दरम्यान चालणारी राजधानी एक्सप्रेसला मथुरा, आगरा, झांसी, बीना आणि नागदामार्गे जाणार.
  • दिल्ली-मुंबईदरम्यान धावणारी अगस्त क्रांति 0954 एक्सप्रेसला मथुरा, आगरा, झांसी, बीना आणि नागदामार्गे जाणार.
  • 02493 पुणे निजामुद्दीन एक्सप्रेसला नागदा, बीना, आगरा कैंट, मथुरामार्गे वळविण्यात आले आहे.
  • दिल्ली-मुंबई दरम्यान धावणारी 02926 पश्चिम एक्सप्रेसला मथुरा, आगरा, झांसी, बीना व नागदामार्गे जाणार.

महाराष्ट्राबाहेरील 'या' रेल्वेंचे वळविण्यात आले मार्ग -

  • ट्रेन नंबर 09039 अवध एक्सप्रेसला सवाई माधोपुरमध्ये थांबवण्यात आले. तिला जयपुर बांदीकुई मार्गे मथुराच्या मार्गे वळविण्यात आले.
  • ट्रेन नंबर 02060 निजामुद्दीनहून कोटा दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्सप्रेसला भरतपुरहून वळवत बांदीकुई जयपुर सवाई माधोपुरच्या मार्गाने कोटा येथे येत आहे.
  • 02401 व 02402 नंदा देवी एक्सप्रेसला कोटा सवाई माधोपुर जयपुर नई दिल्ली मार्गाने वळविले जाईल.
  • 02415 व 02416 इंटरसिटी एक्सप्रेसला दिल्ली-जयपुर-सवाई माधोपुर-कोटा मार्गाने वळविले.
  • 02963 व 02964 मेवाड़ एक्सप्रेसला उदयपुर, चित्तौड़गढ़, चंदेरिया, भीलवाड़ा, अजमेर, जयपुर, दिल्लीच्या मार्गाने वळविले जाईल.

गुर्जर आरक्षण आंदोलन - जयपूरमध्ये इंटरनेट सेवेवर आणखी २४ तासांनी वाढवले निर्बंध

राजस्थानात सध्या आरक्षणाच्या मुद्दयावरून गुर्जर आंदोलनाची ठिणगी उडाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क झाले असून जयपूर जिल्ह्यातील गुर्जर बहुल भागातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती. ते निर्बंध आणखी २४ तासासाठी वाढविण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त सोमनाथ मिश्रा यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. हे निर्बंध 1 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 6 वाजल्यापासून 2 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाढविण्यात आले आहेत.

मागासवर्गीय आणि एमबीसी अंतर्गंत देण्यात आलेल्या आरक्षणासंबंधी काही मागण्या पुढे ठेऊन गुर्जर आरक्षण संघर्ष समितीने रविवार पासून आंदोलन पुकारले आहे. गुर्जर समाजाचे कर्नल किरोडी सिंह बैंसला यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी बयाना-हिडोंन महामार्गावरील पिलूपुरा-कारबारी शहीद स्मारकाजवळ ठिय्या दिला आहे. तसेच रेल्वे मार्गावरील रुळाच्या काही कड्या त्यांनी काढल्या आहेत.

३० तारखेपासून सेवा बंद -

गुर्जर आंदोलनाची आक्रमकता पाहून प्रशासनाने जयपूरमधील गुर्जर बहुल असलेल्या कोटपूतली, पावटा, शाहपुरा, विराटनगर आणि जमवारामगड येथील इंटरनेट सेवा ३० तारखेपासून खंडित केली आहे. कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. आता ती सेवा बंद आणखी २४ तासाची वाढ करण्यात आली आहे.

कारवाई केली जाणार -

विभागीय आयुक्त सोमनाथ मिश्रा यांनी या बाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेता इंटरनेट सेवेवर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोटपुतली, पावटा, शाहपुरा, विराटनगर, जमवारामगड या व्यतिरिक्त फागी, माधोराजपुरा, दूदू और मोजमाबाद या ठिकाणीही इंटरनेट सेवेवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.