ETV Bharat / bharat

श्रीनगर जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक

जम्मू काश्मीरमधली श्रीनगर जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलातील आणि अतिरेक्यांमध्ये चकमकी झाली. परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

सुरक्षा दल
सुरक्षा दल
author img

By

Published : Jun 21, 2020, 11:03 AM IST

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) - जम्मू काश्मीरमधली श्रीनगर जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलातील आणि अतिरेक्यांमध्ये चकमकी झाली. परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच मोबाईल इंटरनेट सेवाही खंडीत करण्यात आली आहे.

दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्यातील गल्ली कादाळ (झुनिमार) भागात सुरक्षा दलांनी शोध मोहीम राबवली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. प्रत्युत्तर दाखल जवानांनीही गोळीबार केला.

दोन ते तीन अतिरेकी या भागात अडकल्याची माहिती आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहर भागातही निर्बंध लादण्यात आले आहेत. यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये चकमकी झाली होती.

दरम्यान जम्मू काश्मिरात सुरक्षा दलांनी लॉकडाऊन काळात तब्बल 68 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर जूनपर्यंत 100 दहशतवादी ठार केले आहेत. यामध्ये काही परदेशी दहशतवाद्यांचाही समावेश आहे. 1 एप्रिल ते 10 जून या काळात झालेल्या विविध चकमकीमध्ये दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. इतर सर्वजण कोरोनाचा सामना करत असताना सुरक्षा दले काश्मिरात दहशतवाद्यांचा बिमोड करण्यात गुंतले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.