गांधीनगर - गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. पोलीस आणि आपत्ती निवारण पथक शर्थीचे प्रयत्न करुन पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढत आहे. मोरबी जिल्ह्यातील टंकारा येथे दोन लहान मुलींना वाचवत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एक पोलीस कर्मचारी पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोन मुलींना खांद्यावर बसवून नेत आहे. तब्बल दीड किलोमीटर अंतर पाण्यातून चालत या मुलींना वाचवले.
-
#WATCH Pruthviraj Jadeja, a Gujarat police constable carried two children on his shoulders for over 1.5 km in flood waters in Kalyanpar village of Morbi district, to safety. (10.08) #Gujarat pic.twitter.com/2VjDLMbung
— ANI (@ANI) August 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Pruthviraj Jadeja, a Gujarat police constable carried two children on his shoulders for over 1.5 km in flood waters in Kalyanpar village of Morbi district, to safety. (10.08) #Gujarat pic.twitter.com/2VjDLMbung
— ANI (@ANI) August 11, 2019#WATCH Pruthviraj Jadeja, a Gujarat police constable carried two children on his shoulders for over 1.5 km in flood waters in Kalyanpar village of Morbi district, to safety. (10.08) #Gujarat pic.twitter.com/2VjDLMbung
— ANI (@ANI) August 11, 2019
भेदरलेल्या या मुलींना गोष्टी सांगून पोलिसाने त्यांची भीतीही घालवली. पृथ्वीराज जडेजा असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून त्याने दोन लहान मुलींचा जीव वाचवला. पाण्यातून बाहेर येत असताना मुलींना भीती वाटायला लागल्यावर त्याने मुलींना गोष्टही सांगितली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी पोलीस कर्मचाऱ्याची प्रशंसा केली.
गुजरातमधील १६८ तालुक्यांमध्ये मध्यम आणि तीव्र पाऊस पडत आहे. राज्यातील १४ धरणे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. एनडीआरएफची १८ पथके नागरिकंना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. नर्मदा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने नर्मदा, भरुच आणि बडोदा जिल्ह्यातील सखल भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.