ETV Bharat / bharat

गुजरात: कोरोना 'पॉझिटिव्ह' आल्यानंतर व्यापाऱ्यानं रेल्वेसमोर उडी मारून संपवलं जीवन - गुजरात कोरोना बाधित रुग्ण आत्महत्या

कुमारपाल शहा(63) असे आत्महत्या केलेल्या हिरे व्यापाऱ्याचे नाव आहे. सुरतमधील नानपुरा येथील ते रहिवासी होते. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर शहा तणावाखाली होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Jul 10, 2020, 5:14 PM IST

गांधीनगर - कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर गुजरातमधील एका हिरे व्यापाऱ्याने आपले जीवन संपविले आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी व्यापाऱ्याने धावत्या रेल्वेपुढे उडी मारून आत्महत्या केली. कोरोना संकटामुळे जगभरातली अनेकजण मानसिक तणावाखाली गेले आहेत. यातून रुग्णांकडून आत्महत्येसारखे पाऊल उचलले जात आहे. देशातील इतर शहरांमध्येही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.

कुमारपाल शहा(63) असे आत्महत्या केलेल्या हिरे व्यापाऱ्याचे नाव आहे. सुरतमधील नानपुरा येथील ते रहिवासी होते. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर शहा तणावाखाली होते. गुरुवारी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर शुक्रवारी सकाळी शहा घरातून स्कूटर घेवून उधाना रेल्वे स्थानकावर पोहचले. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली.

शहा घराबाहेर पडल्याचे समजल्यानंतर कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध केली. कुटुंबिय रेल्वे स्थानकावर पोहचले असता त्यांना गाडी पार्कींगमध्ये दिसली. रेल्वे स्थानकावर शोध घेत असताना जवळज रुळावर त्यांचा मृतदेह आढळून आला. ‘गाडीसमोर उडी मारुन त्यांनी आत्महत्या केल्याचे तपासात समोर आल्याचे, रेल्वे पोलीस उपनिरिक्षक अन्वर मन्सुरी यांनी सांगितले’.

घटनास्थळावर पोलिसांना आत्महत्येपूर्वी लिहलेली चिठ्ठीही मिळाली आहे. कोरोना झाल्यानंतर तणावात असल्याचे त्यांनी चिठ्ठीत म्हटले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.