ETV Bharat / bharat

गुजरात एटीएसकडून दाऊद इब्राहिमच्या साथीदाराला अटक - Abdul Majeed Kutty arrested

अब्दुल माजिद हा दाऊद इब्राहिमचा जवळचा हस्तक होता. त्यासोबतच दाऊदचा भाऊ अनिश, छोटा शकील, अबू सालेम, टायगर मेमन आणि मोहम्मद डोसा यांच्याशीही अब्दुल माजिदचे जवळचे संबंध होते. १९९६ साली दाऊद इब्राहिमने राजस्थानातील बारमेर सीमेवरून स्फोटके तस्करी करून गुजरातमध्ये आणले होते.

गुजरात एटीएसकडून अटक
गुजरात एटीएसकडून अटक
author img

By

Published : Dec 27, 2020, 6:05 PM IST

Updated : Dec 27, 2020, 6:56 PM IST

गांधीनगर - गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कामगिरी केली आहे. दाऊद इब्राहिमच्या जवळच्या हस्तकाला झारखंडच्या जमशेदपूर येथून बेड्या ठोकल्या आहेत. १९९७ सालच्या प्रजासत्ताक दिनी गुजरातमध्ये बॉम्बस्फोट करण्यासाठी दाऊदने त्याच्याकरवी स्फोटके तस्करी केली होती. अब्दुल माजिद कुट्टे असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे.

अब्दुल माजिद हा दाऊद इब्राहिमचा जवळचा हस्तक होता. त्यासोबतच दाऊदचा भाऊ अनिश, छोटा शकील, अबू सालेम, टायगर मेमन आणि मोहम्मद डोसा यांच्याशीही अब्दुल माजिदचे जवळचे संबंध होते. १९९६ साली दाऊद इब्राहिमने राजस्थानातील बारमेर सीमेवरून स्फोटके तस्करी करून गुजरातमध्ये आणले होते.

गुजरात एटीएस
गुजरात एटीएस

सुमारे अडीच कोटींचा माल राजस्थानातील मेहसाना पोलिसांनी जप्त केला होता. त्यात ४ किलो आरडीएक्स, नागा डेटोनेटर्स, पाकिस्तानी बनावटीचे पिस्तूले, १० चिनी बनावटीचे स्फोटके असा हा अडीच कोटींचा माल होता. सुमारे १२५ पिस्तुले, ११३ मॅक्झिन रआणि ७५० कार्टिरेजचा यात समावेश होता. या प्रकरणी पोलिसांनी सात ते आठ जणांना अटक केली आहे. अबू सालेम आणि दाऊद इब्राहिमचाही या प्रकरणाशी संबंध असल्याचे तपासात पुढे आले आहे.

कशी झाली अटक ?

अब्दुल माजिद कुट्टे हा झारखंडमधील जमशेदपूर शहरातील टेल्को मशीद परिसरात राहत असल्याची माहिती गुजरात एटीएसला मिळाली. अब्दुल माजिदने आपले नाव बदलून मोहम्मद कमाल असे ठेवले होते. या माहितीनुसार एटीएसचे पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी जमशेदपूरला रवाना झाले होते. सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल माजिद कुट्टे हा १९६२ साली मुंबईतील माहिम परिसरात जन्मला होता. अब्दुलच्या वडीलांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले होते, तसेच ते एक मेडिकल स्टोअर चालवत होते. १९७८ साली वडिलांच्या मृत्यूनंतर अब्दुल दुबईला गेला होता. तेथे त्याने अल्युमिनियम फिटिंगच्या कंपनीत काम केल्यानंतर १९८४ ला तो पुन्हा मुंबईत आला होता.

दाऊदने पाठवलेल्या स्फोटकांच्या गुन्ह्यात नाव -

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी भारतात हल्ला करण्यासाठी दाऊद इब्राहिम करवी स्फोटके भारतात पाठविण्यासाठी नियोजन आखले होते. १९९७ च्या प्रजासत्ताक दिनी गुजरातमध्ये स्फोट घडवून आणण्याचे दहशतवाद्यांचा कट होता. गुजरात आणि मुंबईत हल्ले घडवून तेथील शांतता नष्ट करण्यासाठी दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांचा प्लॅन होता. त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि आरडीएक्स जमा केले होते. राजस्थानमार्गे ही स्फोटके गुजरातमध्ये आणण्यात येणार होते. मात्र, ही स्फोटके पोलिसांनी जप्त केली होती.

कसा आला होता दाऊदच्या संपर्कात?

मुंबईतील मोहम्मद अली रोड येथे अब्दुल माजिद यांची दाऊद गँगबरोबर ओळख झाली. त्यानंतर दाऊदबरोबर मिळून तो सोन्याची तस्करी करत असे. तसेच त्याचे दुबईला कायम येणेजाणे असे. १९९६ साली दुबईत असताना त्यांची अबू सालेमसोबत भेट झाली. राजस्थानमार्गे गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके तस्करी करण्याची योजना सालेमने अब्दुल माजिदला सांगितली. त्यात तो तयार झाला.

मोहम्मद फाजल नावाच्या व्यक्तीला त्याने याची जबाबदारी दिली होती. मात्र, पोलिसांना सुगावा लागल्याने सर्व स्फोटके जप्त करण्यात आले. त्यानंतर अब्दुल फरार झाला. सुरुवातीला तो बँगकॉकमध्ये गेला. तेथे १९९९ पर्यंत त्याने कोणाच्याही नजरेत न येता काम केले. त्यानंतर पोरबंदर येथील मामुमिया पंजाबिया या व्यक्तीच्या संपर्कात अब्दुल आला. त्याने पुन्हा सोने तस्करीचा धंदा सुरू केला.

दरम्यानच्या काळात, अब्दुल हा जमशेदपूर येथील मोहम्मद इनामली या व्यक्तीच्या संपर्कात आला. त्याच्या सहकार्याने अब्दुलने मोहम्मद कमाल या नावाने बनावट पासपोर्ट तयार केला. त्यानंतर क्वालालांपूर, मलेशिया येथे त्याने कापड व्यवसाय सुरू केला. २०१९ साली तो जमशेदपूर येथे आला. पोलिसांना त्याचा सुगावा लागल्यानंतर सापळा रचून त्याला गुजरात पोलिसांनी अटक केली. त्याची आता कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. न्यायालयाने आधीच त्याला आजन्मकारावासाची शिक्षा सुनावली असून आता त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे.

Last Updated : Dec 27, 2020, 6:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.