ETV Bharat / bharat

गलवान सीमेवरील रक्तपातात बिहारच्या पाच सुपुत्रांनी गमावले प्राण

लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चिनी सैन्यातील संघर्षादरम्यान भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. यात बिहारच्या 5 जवानांचा समावेश आहे. यात सुनील कुमार, अमन कुमार सिंह, जय किशोर सिंह, कुंदन कुमार आणि चंदन यादव यांचा समावेश आहे.

हुतात्मा जवान
हुतात्मा जवान
author img

By

Published : Jun 18, 2020, 12:05 PM IST

पाटणा - लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारी सायंकाळी झालेल्या भारत-चिनी सैन्यातील संघर्षादरम्यान भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. यात बिहारच्या 5 जवानांचा समावेश आहे. यात सुनील कुमार, अमन कुमार सिंह, जय किशोर सिंह, कुंदन कुमार आणि चंदन यादव यांचा समावेश आहे. सुनील कुमार यांचे पार्थिव विमानाने आणण्यात आले. यावेळी राजकीय मतभेद विसरून उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी व विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि जन अधिकार पक्षाचे संस्थापक पप्पू यादव उपस्थित होते.

हुतात्मा अमन कुमार सिंह यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

समस्तीपूर जिल्ह्यात शिपाई अमन कुमार सिंह यांच्या कुटुंबीयांवर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या वर्षी अमन कुमार सिंह यांचे लग्न झाले होते. अमन यांनी दिलेल्या बलिदानाचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. आम्ही त्यांच्या पार्थिवाची वाट पाहत आहोत. अमन यांच्या मृत्यूची बातमी खोटी असावी, अशी आशा त्यांच्या कुटुंबीयांना असल्याचे अमन यांच्या गावातील एका तरुणाने सांगितले.

हुतात्मा जवान जय किशोर यांच्या घरी सुरू होती लग्नाची तयारी...

वैशाली जिल्ह्यातील चकफताह गावातील हुतात्मा जवान जय किशोर सिंह यांच्या आई घटनेची माहिती मिळाल्यापासून धक्काबसल्याने अद्याप बोलण्याच्या स्थितीत नाहीत. किशोर यांच्या निधनाची वार्ता कळताच गावावर शोककळा पसरली. किशोर हे दोन वर्षांपूर्वी सैन्य दलात भरती झाले होते. त्यांच्या लग्नाची घरी तयारी सुरू होती. जय किशोर यांचे मोठे भाऊ नंद किशोर हे देखील सैन्यात नोकरीवर असून सिक्कीम येथे तैनात आहे. जय किशोर सिंहचे दोन धाकटे भाऊ अजूनही शिकत आहेत. वडील राज कपूर सिंग यांनी मुलाचे स्मारक उभारण्याची इच्छा व्यक्त केली.

हुतात्मा जवान कुंदन यादव यांच्या मागे पत्नी बेबी देवी आणि दोन मुले...

कुंदन कुमार यांच्या निधनाची वार्ता कळताच सत्तरकट्टय्या प्रदेशातील आरण गावामध्ये शोककळा परसली आहे. हुतात्मा जवान कुंदन यादव यांच्या मागे पत्नी बेबी देवी आणि दोन मुले, रोशन (6) आणि राणा कुमार (4) आहेत. कुंदन कुमार 2012 मध्ये सैन्यात दाखल झाले होते. आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनीही व्हिडिओ कॉन्फरेन्सद्वारे कुंदनच्या कुटुंबाशी संवाद साधला आणि त्यांना या कठीण काळात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

हुतात्मा जवान चंदन चार महिन्यांपूर्वीच घरी आले होते...

भोजपूरच्या जगदीशपूर ब्लॉकच्या कौरा पंचायती अंतर्गत असलेल्या ज्ञानपुरा गावात राहणारे शिपाई चंदन कुमार भारत-चिनी सैन्यातील संघर्षादरम्यान हुतात्मा झाले. 24 वर्षीय चंदन चार महिन्यांपूर्वी आपल्या गावी आले होते. चंदन यांना चार भाऊ आहेत. चंदन यांचा मोठा भाऊ सैन्यात आहेत. तर चंदन सर्वात धाकटे होते. त्यांचे या वर्षी लग्न होणार होते. मात्र, लॉकडाऊनमुळे लग्न पुढे ढकलण्यात आले होते.

हुतात्मा जवान सुनील कुमार यांना दोन मुले आणि एक मुलगी...

लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चिनी सैन्यातील हाणामारीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. यात बिहारच्या बिहटा जिल्ह्यातील पैतृक या गावातील सुनील कुमार यांचाही समावेश आहे. वीर जवान सुनील कुमार यांनी 2002 साली बिहार रेजिमेंटमधून सैन्यात भरती झाले होते. 2003 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. सुनील यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. एक वर्षापूर्वी लडाख येथे त्यांची बदली झाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.