श्रीनगर - काश्मिरातील शोपियान जिल्ह्यात संशयित दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला करत गोळीबार केला. जिल्ह्यातील बोनबझार भागात ही घटना आज(बुधवार) घडली. या हल्ल्यात जीवितहानी किंवा जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली नाही.
हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरु केला आहे. काश्मीरला स्वायत्तता देणारे कलम 370 रद्द केल्याच्या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर काश्मिरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तरीही दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला घडवून आणला. काश्मीरात या वर्षाच्या सुरुवातीपासूून सुमारे 150 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.