ETV Bharat / bharat

बिहारमध्ये पेट्रोल टाकून मायलेकींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न - bihar

विलायती चिंच तोडण्याच्या कारणावरून एका मुलाने स्वतःच्याच आजी आणि आत्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

रूग्णालयाती छायाचित्र
author img

By

Published : May 19, 2019, 10:02 AM IST

Updated : May 19, 2019, 11:17 AM IST

पाटणा - विलायती चिंच तोडण्याच्या कारणावरून एका मुलाने स्वतःच्याच आजी आणि आत्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना बिहारच्या खरहट (ता. रानीगंज, जि. अररिया) गावात घडली. यानंतर गावकऱ्यांनी त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

विलायती चिंच तोडण्याच्या कारणावरून संबंधितांत वाद निर्माण झाला होता. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. पहिल्या गटातील अमली देवी ही महिला आणि तिची मुलगी सोसो देवी या दोघींनीही या वादात उडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या गाटातील लोकांनी त्या दोघींना अंगावर पेट्रोल टाकून पेटवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक धूरत शायली सांवलाराम यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपींना तत्काळ ताब्यात घेऊन कारवाई करू, असे आश्वासन दिले.

60 टक्क्यांहून अधिक भाजली महिला

भाजलेल्या दोन्ही महिलांना गावकऱ्यांनी गंभीर जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल केले. त्यावर डॉ. विनोद यांनी त्या दोघींनाही कटिहार येथे उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. दोन्ही महिलांचे शरीर 60 टक्क्यांहून अधिक भाजल्याची माहिती त्यांनी दिली.

Intro:Body:

asdas

Conclusion:
Last Updated : May 19, 2019, 11:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.