ETV Bharat / bharat

'कोरोना लस वितरणासंदर्भात केंद्र सरकारचा हलगर्जीपणा चिंताजनक' - राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

कोरोना लसीच्या वितरणासंदर्भात योग्य रणनीती न आखल्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी
राहुल गांधी
author img

By

Published : Aug 27, 2020, 1:27 PM IST

नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाचे थैमान असून दररोज रुग्ण संख्येत वाढ होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरामधील अनेक देशात कोरोना विषाणूवर लस विकसित करण्यात येत आहे. यात भारताचाही समावेश आहे. कोरोना लसीच्या वितरणासंदर्भात योग्य रणनीती न आखल्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

  • A fair and inclusive Covid vaccine access strategy should have been in place by now.

    But there are still no signs of it.

    GOI’s unpreparedness is alarming. https://t.co/AUjumgGjGC

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) August 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोरोना लसीच्या वापरासाठी आणि वितरणासाठी निष्पक्ष आणि सर्वसमावेशक रणनीती आतापर्यंत तयार व्हायला हवी होती. मात्र, याबाबत अद्याप कोणतेच नियोजन सरकारने केले नसल्याचे पाहायला मिळत आहे. भारत सरकारचा हलगर्जीपणा चिंताजनक आहे, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे. या टि्वटला त्यांनी आपले 14 ऑगस्टचेही टि्वटही जोडले आहे.

दरम्यान, 'कोरोनावर लस तयार करणार्‍या देशांपैकी भारत एक असणार आहे. त्यासाठी लसीच्या वितरणासंदर्भात सर्वसमावेशक रणनीती आखायला हवी', असे राहुल गांधींनी 14 ऑगस्टला केलेल्या टि्वटमध्ये म्हटले होते.

गेल्या 24 तासांत भारतात एकूण 75 हजार 760 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून 1 हजार 23 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण मृतांचा आकडा हा 60 हजार 472 वर पोहोचला आहेत, तर एकूण कोरोना रुग्णसंख्या 33 लाख 10 हजार 235 झाली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.