नवी दिल्ली - नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या विरोधात जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन अजूनही शमलेले नाही. वादग्रस्त नागरिकता विधेयक आणि एनआरसी माघारी घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. जोपर्यंत कायदा मागे घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
हेही वाचा - 'बंगालमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा कसा लागू करता मी पाहतेच'
सरकारच्या विरोधात घोषणाबाजी
आंदोलक विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपीता महात्मा गांधीचे फोटो हातात घेऊन आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांनी तोंडाला पट्ट्या बांधलेल्या आहेत. सरकार आम्हाला बोलू देत नाही, आमचा आवाज दाबण्यात येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
हेही वाचा - CAA protest: हरियाणातील नूह जिल्ह्यात आंदोलन, २ हजार पोलीस सुरक्षेसाठी तैनात
आंदोलन सुरूच राहिल विद्यार्थ्यांचा पवित्रा
जोपर्यंत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक माघारी घेण्यात येत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. गृहमंत्री कायदा मागे घेणार नाहीत, असे म्हणाले आहेत, मात्र, आम्हीही आमच्या मागणीवर अडून बसलो आहोत, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. जामिया विद्यापीठ आणि परिसरामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.