नवी दिल्ली - केंद्र सरकार ज्या विमानळावर वार्षिक १० ते १५ लाख विमान प्रवासी आहेत, अशा विमानतळांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत आहेत. विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरुप्रसाद मोहापात्रा यांनी याबाबत माहिती दिली आहे.
केंद्र सरकार अधिकाधिक विमानतळांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत आहे. भारतात खासगीकरण करण्यायोग्य जवळपास २०-२५ विमानतळे आहेत. येणाऱ्या काही दिवसात आपल्याला या विमानतळांचे खासगीकरण झालेले दिसून येईल. अशा विमानतळावर दरवर्षी जवळपास १० ते १५ लाख प्रवाशांची वाहतूक होणार आहे, अशी माहिती गुरुप्रसाद मोहापात्रा यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने सध्या ६ विमानतळांचे खासगीकरण करण्याचे ठरवले आहे. ६ पैकी ३ विमानतळांचे खासगीकरणाला मंजुरी मिळाली आहे. खासगीकरणाच्या यादीत अजून विमानतळांचा समावेश होणार आहे. खासगीकरणाच्या पुढील टप्पात विदेशातील काही कंपन्या प्रस्ताव देतील, अशी केंद्र सरकारला आशा आहे. सध्या काही विमानतळांवर 'डिजी यात्रे'ची सुरुवात करण्यात येणार आहे. अशा विमानतळावर पेपरलेस प्रवास करता येणार आहे.