मंगळुरु - तब्बल १ किलो सोने घेऊन येणाऱ्या एका तस्कराला कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली. दुबईवरुन मंगळुरुला येणाऱ्या तस्कराला बाजपे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक करण्यात आली.
आरोपीकडे दुबईहून आणलेले १.०७४ किलो २४ कॅरेट शुद्ध सोने होते. हे लक्षात आल्यानंतर, कस्टम अधिकाऱ्यांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेतले.
या सोन्याची एकूण किंमत ३३, लाख ८ हजार ६७५ रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बाजपे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.