ETV Bharat / bharat

मंगळसुत्राची तुलना कुत्र्याच्या गळ्यातील साखळीशी, गोव्यातील प्राध्यापक महिलेविरोधात एफआयआर - गोवा विधी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक शिल्पा सिंह

गोवा विधी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक शिल्पा सिंह यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये मंगळसुत्राची तुलना कुत्र्याच्या गळ्यातील साखळीशी केली होती. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय हिंदू युवा वाहिनी गोवा युनिटच्या राजीव झा यांनी शिल्पा सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तथापि, प्रोफेसर शिल्पा सिंह यांनी फेसबुक पोस्टवरून वाद निर्माण झाल्यानंतर माफी मागितली आहे.

मंगळसुत्राची तुलना कुत्र्याच्या गळ्यातील साखळीशी केल्याने प्राध्यापक महिलेविरोधात एफआयआर

author img

By

Published : Nov 14, 2020, 11:04 AM IST

पणजी - गोवा विधी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक शिल्पा सिंह यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रीय हिंदू युवा वाहिनी गोवा युनिटच्या राजीव झा यांनी ही एफआयआर दाखल केली आहे. तथापि, फेसबुक पोस्टवरून वाद निर्माण झाल्यानंतर शिल्पा सिंह यांनी माफी मागितली आहे. शिल्पा सिंह यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये मंगळसुत्राची तुलना कुत्र्याच्या गळ्यातील साखळीशी केली होती.

प्राध्यापक शिल्पा सिंह यांनी 21 एप्रिलला सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. संबधित पोस्टमध्ये त्यांनी मंगळसुत्राची तुलना कुत्र्याच्या गळ्यातील साखळीशी केली होती. याविरोधात दक्षिण गोव्यातील पोंडा येथील रहिवासी राजीव झा यांनी त्यांच्याविरोधात गोवा पोलिसात एफआयआर दाखल केली. शिल्पा सिंह यांनी हिंदू धर्माबद्दल सोशल मीडियावर अपमानास्पद टिपण्या केल्या आणि धार्मिक भावनांची खिल्ली उडविल्याचा आरोप झा यांनी केला.

पोलिसांकडे सुरक्षेची मागणी -

शिल्पा सिंह यांनी पोलिसांकडे संरक्षण मागितले आहे. सोशल मीडियावर धमकीचे संदेश येत असून आपला जीव धोक्यात आहे. त्यामुळे सुरक्षा पुरवण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणात एबीव्हीपीनेही शिल्पा सिंहविरोधात महाविद्यालयात तक्रार केली होती. मात्र, त्यावर महाविद्यालयाने कोणतीही कारवाई करण्यास नकार दिला. प्राध्यापक शिल्पा सिंह समाजात एखाद्या विशिष्ट धर्माविरूद्ध द्वेषयुक्त विचार पसरवत आहेत. त्यांना त्वरित पदावरून हटवावे अशी मागणी एबीव्हीपीने केली होती.

मागितली माफी -

प्रोफेसर शिल्पा सिंह यांनी फेसबुक पोस्टवरून वाद निर्माण झाल्यानंतर माफी मागितली. 'माझे शब्द चुकीच्या पद्धतीने घेतले गेले होते, परंतु माझ्या पोस्टमुळे दु: खी झालेल्या सर्व महिलांची मी माफी मागते, असे त्यांनी म्हटलं. तसेच लग्नानंतर वैवाहिक दर्जाचे प्रतीक केवळ स्त्रियांसाठीच का महत्वाचे आहे. ते पुरुषांसाठी का नाही, हा प्रश्न मला लहानपणापासूनच पडत आला आहे, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा - एनडीए सत्तेत आल्यापासून दिल्लीत गुन्ह्यांमध्ये वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.