पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून पर्रिकरांच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा पसरत आहेत. याबाबत आता गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे.
With respect to some reports in media, it is hereby stated that Hon’ble Chief Minister @manoharparrikar's health parameters continues to remain stable.
— CMO Goa (@goacm) March 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">With respect to some reports in media, it is hereby stated that Hon’ble Chief Minister @manoharparrikar's health parameters continues to remain stable.
— CMO Goa (@goacm) March 16, 2019With respect to some reports in media, it is hereby stated that Hon’ble Chief Minister @manoharparrikar's health parameters continues to remain stable.
— CMO Goa (@goacm) March 16, 2019
मुख्यमंत्री पर्रिकर यांना अन्नाशयाचा कर्करोग झाला आहे. ६३ वर्षीय पर्रिकर यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गोव्यातील निवासस्थानी पर्रिकरांवर उपचार सुरू आहेत. नियमित तपासणीसाठी मुख्यमंत्री पर्रिकर यांना गोव्याच्या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. याआधी 3 मार्चला त्यांची नियमित तपासणी झाली होती. तर फेब्रुवारी महिन्यात त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती.
दरम्यान, गोव्यात काँग्रेसने राज्यपालांना पत्र पाठवून सत्तास्थापनेचा दावा केला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असल्याने ते सरकार चालवू शकत नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी सरकार बरखास्त न करता आम्हाला सत्तास्थापनेची संधी द्यावी, असे या पत्रात म्हणण्यात आले आहे