ETV Bharat / bharat

केंद्रीय खाण खात्याकडून जिल्हा खनिज निधीतील 52 कोटी वापरण्याची परवानगी - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - पणजी

गोवा सरकारने दक्षिण गोव्यात सुरू केलेल्या रुग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच व्हायरालॉजी प्रयोगशाळा आजपासून पूर्ण क्षमतेने कार्यरत झाली आहे. काही प्रमाणात रोजच्या औषधांचा तुटवडा जाणवत आहे. याकरिता अन्न आणि औषध प्रशासन राज्यातील घाऊक औषध विक्रेत्यांच्या संपर्कात असून आवश्यकसाठा पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

goa cm pramod sawant addressed media on corona outbreak
केंद्रीय खाण खात्याकडून जिल्हा खनिज निधीतील 52 कोटी वापरण्याची परवानगी - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
author img

By

Published : Mar 30, 2020, 9:02 PM IST

पणजी - कोविड - 19 च्या लढाईत सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्रीय खाण खात्याने जिल्हा खनिज निधीतील 52 कोटींचा निधी वापरण्याची परवानगी दिली आहे. तसेच सरकार 200 व्हेंटिलेटर खरेदी करत आहे, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

आल्तिनो-पणजी येथील महालक्ष्मी निवासस्थानी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, गोवा सरकारने दक्षिण गोव्यात सुरू केलेल्या रुग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच व्हायरालॉजी प्रयोगशाळा आजपासून पूर्ण क्षमतेने कार्यरत झाली आहे. काही प्रमाणात रोजच्या औषधांचा तुटवडा जाणवत आहे. याकरिता अन्न आणि औषध प्रशासन राज्यातील घाऊक औषध विक्रेत्यांच्या संपर्कात असून आवश्यकसाठा पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन काळात लोकांना पुरेल इतका अन्नधान्य साठा उपलब्ध आहे. तसेच आज कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून धान्याची वाहने सोडण्याची विनंतीही केली आहे, असे डॉ. सावंत म्हणाले.

गोव्यात 10 शिबिरांत बेघरांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून मामलेदार आणि उपजिल्हाधिकारी त्यांना आवश्यक जेवण वेळेवर देण्याचे काम करत आहेत. काहींना ते भाड्याने राहत असलेल्या खोलीवर सोडण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गोवा सरकारच्या फलोत्पादन महामंडळाच्यावतीने त्यांच्या स्टॉलच्या माध्यमातून 252 टनांहून अधिक भाजीचे वितरण करण्यात आले आहे.

आता राज्यात किराणामाल आणि भाजीपाला उपलब्ध आहे. घरपोच सेवा देण्यासाठी स्वयंसेवकांचे काम करण्यासाठी प्रत्येक पोलीस स्थानकात 300हून अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे स्थानिक आमदारांना प्रत्येकी 20 निवडण्याची परवानगी दिली आहे. कामगार कल्याण विभागाकडून अजून पत्र प्राप्त झालेले नाही. परंतु याकडील लाभासाठी 15 हजार नोंदणीकृत कामगार पात्र आहेत, असे सांगून डॉ. सावंत म्हणाले, गोवा औषध निर्मितीमध्ये चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे.

गोव्यात औषधांचा तुटवडा पडू नये म्हणून काही औषध निर्माता कंपन्यांना परवानगी दिली आहे. परंतु यासाठी परराज्यातील कामगार आणता येणार नाहीत. कामगार आयुक्त यावर लक्ष ठेवून आहेत. सरकारी कर्मचारी समन्वयाने काम करत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

'त्या' प्रवाशाच्या सहप्रवाशांना आवाहन -

29 मार्च रोजी न्यूयॉर्क ते मुंबई असा प्रवास केलेला प्रवाशी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात कोरोना विषाणू संसर्गाचा पॉझिटिव्ह रूग्ण सापडला आहे. तो दि. 22 मार्च रोजी विस्तारा डॉमेस्टिक विमानाने (युके-861) मुंबईतून गोव्यात आला होता. त्याच्यासोबत गोव्यात आलेल्या सहप्रवाशांनी तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा अथवा हेल्पलाईन क्रमांक 104 किंवा 0832-2421810 किंवा 2225538 या क्रमांकावर संपर्क साधला, असे आवाहन करण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.