ETV Bharat / bharat

गोवा भाजप उमेदवारांची घोषणा; विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी

गोव्यातील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणूक उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. गोव्यात लोकसभेच्या २ जागा असून विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांना उत्तर गोव्यासाठी तर, दक्षिण गोव्यासाठी नरेंद्र सावईकर यांना संधी देण्यात आली आहे.

author img

By

Published : Mar 24, 2019, 6:39 AM IST

नरेंद्र सावईकर, श्रीपाद नाईक

पणजी - गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी भाजपने आपल्या विद्यमान खासदारांनाच संधी दिली आहे. तसेच यावेळी विधानसभेच्या तिन्ही जागांच्या उमेदवारांची नावेही आज संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवड समितीने जाहीर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि भाजपच्या केंद्रीय निवड समितीची आज दिल्ली येथे पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी भाजप उमेदवारांची सहावी यादी घोषित करण्यात आली. यामध्ये गोव्यातील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणूक उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. गोव्यात लोकसभेच्या २ जागा असून विद्यमान खासदारांनाच संधी देण्यात आली आहे. यामध्ये उत्तर गोव्यासाठी श्रीपाद नाईक तर दक्षिण गोव्यासाठी नरेंद्र सावईकर यांची निवड करण्यात आली आहे. तर गोवा विधानसभेच्या ३ जागांसाठी पोटनिवडणूक घोषित करण्यात आली आहे. मांद्रे येथील काँग्रेस आमदार दयानंद मांद्रेकर, शिरोडा मतदारसंघातील काँग्रेस आमदार सुभाष शिरोडकर यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर म्हापसाचे आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनामुळे ही जागा रिकामी झाली होती. या तीनही जागांसाठीची पोटनिवडणूक लोकसभा निवडणुकी दिवशी २३ एप्रिलला होणार आहे.

यापैकी मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघात भाजपप्रवेश केलेल्या माजी आमदारांनाच संधी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. तर म्हापसा जागेसाठी पक्षात वरिष्ठ पातळीवर चर्चा होत होती. यामध्ये म्हापसा भाजप गटाध्यक्ष तथा नगरसेवक सुधीर कांदोळकर यांचेही नाव उमेदवारीसाठी होते. त्यामुळे याठिकाणी कोणाला उमेदवारी मिळते याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर माजी उपमुख्यमंत्री डिसोझा यांचे चिरंजीव जोशुआ यांच्या नावाची आज दिल्लीत घोषणा करण्यात आली. त्यामुळे म्हापसा जागेचा तिढा सुटला आहे. मात्र, दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे रिक्त जागेसाठी निवडणूक आयोगाने अद्याप घोषणा केलेली नाही.

Intro:Body:

गोवा भाजप उमेदवारांची घोषणा; विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी

पणजी - गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी भाजपने आपल्या विद्यमान खासदारांनाच संधी दिली आहे. तसेच यावेळी विधानसभेच्या तिन्ही जागांच्या उमेदवारांची नावेही आज संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवड समितीने जाहीर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि भाजपच्या केंद्रीय निवड समितीची आज दिल्ली येथे पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी भाजप उमेदवारांची सहावी यादी घोषित करण्यात आली. यामध्ये गोव्यातील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणूक उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.गोव्यात लोकसभेच्या २ जागा असून विद्यमान खासदारांनाच संधी देण्यात आली आहे. यामध्ये उत्तर गोव्यासाठी श्रीपाद नाईक तर दक्षिण गोव्यासाठी नरेंद्र सावईकर यांची निवड करण्यात आली आहे. तर गोवा विधानसभेच्या ३ जागांसाठी पोटनिवडणूक घोषित करण्यात आली आहे. मांद्रे येथील काँग्रेस आमदार दयानंद मांद्रेकर, शिरोडा मतदारसंघातील काँग्रेस आमदार सुभाष शिरोडकर यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर म्हापसाचे आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनामुळे ही जागा रिकामी झाली होती. या तीनही जागांसाठीची पोटनिवडणूक लोकसभा निवडणुकी दिवशी २३ एप्रिलला होणार आहे. 

यापैकी मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघात भाजपप्रवेश केलेल्या माजी आमदारांनाच संधी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. तर म्हापसा जागेसाठी पक्षात वरिष्ठ पातळीवर चर्चा होत होती. यामध्ये म्हापसा भाजप गटाध्यक्ष तथा नगरसेवक सुधीर कांदोळकर यांचेही नाव उमेदवारीसाठी होते. त्यामुळे याठिकाणी कोणाला उमेदवारी मिळते याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर माजी उपमुख्यमंत्री डिसोझा यांचे चिरंजीव जोशुआ यांच्या नावाची आज दिल्लीत घोषणा करण्यात आली. त्यामुळे म्हापसा जागेचा तिढा सुटला आहे. मात्र, दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे रिक्त जागेसाठी निवडणूक आयोगाने अद्याप घोषणा केलेली नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.