हैदराबाद – कोरोना महामारीचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज 1 कोटीचा आकडा पार केला आहे. जगभरात 1 कोटी 4 लाख 2 हजार 637 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 5 लाख 7 हजार 518 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाणही दिलासादायक आहे. जगभरात 56 लाख 56 हजार 562 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने नेपाळ सरकारने टाळेबंदी 22 जूलैपर्यंत वाढविली आहे. नेपाळ मंत्रिमंडळाची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत टाळेबंदी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. टाळेबंदीदरम्यान मर्यादित व्यवसाय व इतर बाबी चालू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे.
नेपाळ सरकारने 15 जूनपासून टाळेबंदीत बदल केला आहे. शारीरिक अंतर ठेवून व्यवसाय सुरू ठेवण्याची लोकांना परवानगी दिली आहे. तर खासगी वाहनांना सम आणि विषमच्या क्रमांकाप्रमाणे परवानगी देण्यात आली आहे. प्रवासी वाहतुकीसाठी मर्यादा घालून दिली आहे. संपूर्ण नेपाळमध्ये मार्चपासून टाळेबंदी आहे. यापूर्वी किमान सहावेळा टाळेबंदीला मुदतवाढ देण्यात आली आहे. नेपाळमध्ये रोज नव्या400 कोरोना रुग्णांची होत असल्याचे नेपाळच्या माध्यमांनी वृत्तातून माहिती दिली आहे.