ETV Bharat / bharat

ग्वाल्हेरमध्ये 'कोंबड्यांच्या कुटुंबाची हत्या'; शेजाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल

भांडण झाल्याच्या रागातून शेजाऱ्यांनी विषारी धान्य खायला घालून जाणूनबजून या कोंबड्यांना मारले असल्याचे या महिलेने म्हटले आहे. पोलिसांना या महिलेचे म्हणणे योग्य वाटल्याने तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे.

कोंबड्यांच्या कुटुंबाची हत्या
author img

By

Published : Jun 30, 2019, 9:50 PM IST

Updated : Jun 30, 2019, 11:15 PM IST

ग्वाल्हेर - मध्य प्रदेशात ग्वाल्हेर शहरात झाशी रोड परिसरात पोलिसांनी पाळीव कोंबड्यांना मारल्याप्रकरणी तक्रार दाखल करून घेतली आहे. प्रकरण विचित्र वाटत असले तरी, कोंबड्या पाळणाऱ्या महिलेने शेजाऱ्यांवर या कोंबड्यांना विष घालून मारल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर पोलिसांनी 'कोंबड्यांच्या कुटुंबाची हत्या' केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

भांडण झाल्याच्या रागातून शेजाऱ्यांनी विषारी धान्य खायला घालून जाणूनबजून या कोंबड्यांना मारले असल्याचे या महिलेने म्हटले आहे. पोलिसांना या महिलेचे म्हणणे योग्य वाटल्याने तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे.

कोंबड्यांच्या कुटुंबाची हत्या

झाशी रोड परिसरातील वैष्णो देवी मंदिराजवळ ही गरीब महिला राहते. तिने तिच्या उदरनिर्वाहासाठी काही कोंबड्या आणि कोंबडे पाळले आहेत. काही दिवसांपूर्वी तिच्या शेजारी राहणाऱ्या २ तरुणांनी तिच्याकडे कोंबड्यांच्या पिल्लांची मागणी केली होती. सुमेर सिंह प्रजापति आणि सुरेंद्र खटीक अशी या तरुणांची नावे आहेत. संबंधित महिलेने कोंबडे किंवा कोंबड्यांची पिल्ले देण्यास साफ नकार दिला होता. या कारणाने तिचे या दोघांशी भांडण झाले होते. या तरुणांनी या रागातून ३ दिवसांपूर्वी महिलेच्या ८ कोंबड्यांसमोर विष मिसळलेले धान्य टाकले होते. विषारी धान्य खाल्ल्याने यातील ५ कोंबडे-कोंबड्यांचा मृत्यू झाला. तर, इतरही आजारी आहेत, अशी माहिती या महिलेने दिली आहे.

पोलिसांनी या प्रकार सुरुवातीला फारसा गांभीर्याने घेतला नव्हता. मात्र, या महिलेने पुरावा दाखवल्यानंतर मेलेल्या कोंबड्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाच्या अहवालांच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींवर तक्रार दाखल केली आहे. या आरोपींचा शोध सुरू आहे.

Intro:ग्वालियर
शहर के झांसी रोड इलाके में पुलिस को पालतू मुर्गों की हत्या का मामला दर्ज करना पड़ा है मुर्गो को पालने वाली महिला का कहना है कि उसके पड़ोसियों ने रंजिश के चलते उसके पालतू मुर्गों को जहरीला दाना डालकर मार डाला पुलिस ने मामले की शिकायत सही पाते हुए दोनों पड़ोसी युवकों के खिलाफ मामला दर्ज कर लिया है।

Body:दरअसल झांसी रोड इलाके के वैष्णो देवी मंदिर के पास रहने वाली गरीब मजदूर महिला ने जीवन यापन के लिए कुछ मुर्गे मुर्गियों को पाल रखा है मुर्गों के बच्चों को मांगने के चलते पड़ोसी सुमेर सिंह प्रजापति और सुरेंद्र खटीक से महिला की लड़ाई हो गई थी महिला ने अपने पालतू मुर्गों अथवा उनके बच्चों को देने से साफ तौर पर इंकार कर दिया था इसी पर पड़ोसी युवक उस महिला से रंजिश रखने लगे थे 3 दिन पहले पड़ोसी युवकों सुमेर प्रजापति और सुरेंद्र खटीक ने उसके करीब 8 मुर्गे मुर्गियों को जहरीला दाना डाल दिया इनमें से 5 मुर्गे मुर्गियों की मौत हो गई जबकि कुछ मुर्गी मुर्गी बीमार हो गए।

Conclusion:खास बात यह है कि गुड्डी देवी की लड़की पूजा ने सुमेर और सुरेंद्र को दाना डालते हुए देख लिया था उसके बाद ही 5 मुर्गी मुर्गी दम तोड़ गए पुलिस ने पहले तो इस मामले को हल्के में लिया लेकिन महिला ने जब सबूत दिए तो मुर्गे मुर्गियों का पोस्टमार्टम कराया गया अब पुलिस पोस्टमार्टम आधार पर दोनों आरोपियों के खिलाफ 429 का मामला दर्ज कर उनकी तलाश कर रही है। पोस्टमार्टम रिपोर्ट मिलते ही इस मामले में आगे कार्रवाई की जाएगी। बाइट दामोदर गुप्ता ..थाना प्रभारी झांसी रोड ग्वालियर
Last Updated : Jun 30, 2019, 11:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.