ETV Bharat / bharat

बॉम्बस्फोटातील आरोपीला तिकिट देणे हा लोकशाहीवरील हल्ला - शरद पवार - democracy

'मुस्लीम समाजाकडून पवित्र मानण्यात येणाऱ्या शुक्रवारी (जुमा) मालेगाव येथे मशिदीवर हल्ला झाला. मला नाही वाटत एखादा मुस्लीम जुम्याच्या दिवशी बॉम्बस्फोट घडवून आणेल. त्यामुळे मी तपास संस्थांकडून सुरुवातीला पकडलेल्या लोकांवर कारवाई करण्याविषयी आक्षेप घेतला होता,' असे पवार म्हणाले.

शरद पवार
author img

By

Published : Jun 10, 2019, 6:06 PM IST

नवी दिल्ली - बॉम्बस्फोटातील आरोपीला निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारीचे तिकिट देणे हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. पवार यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी दिल्यावरून भाजपवर निशाणा साधला. साध्वी २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत.

'मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या महिलेला लोकसभा उमेदवारीचे तिकिट देणे हा लोकशाहीवरील हल्ला आहे. ही महिला मध्य प्रदेशातून निवडून आली आहे,' असे म्हणत पवार यांनी भाजप आणि भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर हल्ला चढवला.

'मुस्लीम समाजाकडून पवित्र मानण्यात येणाऱ्या शुक्रवारी (जुमा) मालेगाव येथे मशिदीवर हल्ला झाला. मला नाही वाटत एखादा मुस्लीम जुम्याच्या दिवशी बॉम्बस्फोट घडवून आणेल. त्यामुळे मी तपास संस्थांकडून सुरुवातीला पकडलेल्या लोकांवर कारवाई करण्याविषयी आक्षेप घेतला होता. त्यानंतर हेमंत करकरे यांनी आता संसदेत बसू पाहणाऱया या व्यक्तीला (साध्वी प्रज्ञा) अटक केली,' असे पवार म्हणाले.

मागील आठवड्यात साध्वी प्रज्ञा एनआयए न्यायमूर्ती विनोद पराडकर यांच्यासमोर विशेष न्यायालयात उपस्थित झाल्या होत्या. तेथे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यांच्याशिवाय, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय राहीरकर, समीर कुलकर्णी आणि सुधाकर चतुर्वेदी हेही या प्रकरणातील आरोपी आहेत.

त्यांच्यावर भारतीय दंड विधानातील बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायदा (UAPA), सेक्शन १६ (दहशतवादी कृत्ये करणे), सेक्शन १६ (दहशतवादी कृत्यांचा कट रचणे), सेक्शन १२० (बी) (गुन्हेगारी कट रचणे), ३०२ (हत्या), ३०७ (हत्येचा प्रयत्न), ३२४ (हेतूपूर्वक दुखापत घडवून आणणे), १५३ (ए) (दोन धार्मिक गटांमध्ये द्वेषभाव उत्पन्न करणे) आदी अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

Intro:Body:

बॉम्बस्फोटातील आरोपीला तिकिट देणे हा लोकशाहीवरील हल्ला - शरद पवार

नवी दिल्ली - बॉम्बस्फोटातील आरोपीला निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारीचे तिकिट देणे हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. पवार यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी दिल्यावरून भाजपवर निशाणा साधला. साध्वी २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत.

'मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या महिलेला लोकसभा उमेदवारीचे तिकिट देणे हा लोकशाहीवरील हल्ला आहे. ही महिला मध्य प्रदेशातून निवडून आली आहे,' असे म्हणत पवार यांनी भाजप आणि भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर हल्ला चढवला.

'मुस्लीम समाजाकडून पवित्र मानण्यात येणाऱ्या शुक्रवारी (जुमा) मालेगाव येथे मशिदीवर हल्ला झाला. मला नाही वाटत एखादा मुस्लीम जुम्याच्या दिवशी बॉम्बस्फोट घडवून आणेल. त्यामुळे मी तपास संस्थांकडून सुरुवातीला पकडलेल्या लोकांवर कारवाई करण्याविषयी आक्षेप घेतला होता. त्यानंतर हेमंत करकरे यांनी आता संसदेत बसू पाहणाऱया या व्यक्तीला (साध्वी प्रज्ञा) अटक केली.'

मागील आठवड्यात साध्वी प्रज्ञा एनआयए न्यायमूर्ती विनोद पराडकर यांच्यासमोर विशेष न्यायालयात उपस्थित झाल्या होत्या. तेथे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यांच्याशिवाय, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय राहीरकर, समीर कुलकर्णी आणि सुधाकर चतुर्वेदी हेही या प्रकरणातील आरोपी आहेत.

त्यांच्यावर भारतीय दंड विधानातील बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायदा (UAPA), सेक्शन १६ (दहशतवादी कृत्ये करणे), सेक्शन १६ (दहशतवादी कृत्यांचा कट रचणे), सेक्शन १२० (बी) (गुन्हेगारी कट रचणे), ३०२ (हत्या), ३०७ (हत्येचा प्रयत्न), ३२४ (हेतूपूर्वक दुखापत घडवून आणणे), १५३ (ए) (दोन धार्मिक गटांमध्ये द्वेषभाव उत्पन्न करणे) आदी अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.