ETV Bharat / bharat

दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिजवान मुंबईत जेरबंद, २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

दाऊद इब्राहिमचा पुतण्या आणि इकबाल कासकरचा मुलगा रिजवान कासरकर याला हवाला रॅकेट संदर्भात मुंबई पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असता रिजवानला २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

रिजवानला पोलीस कोठडी
author img

By

Published : Jul 18, 2019, 12:55 PM IST

Updated : Jul 18, 2019, 4:57 PM IST

मुंबई - कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा पुतण्या आणि इकबाल कासकरचा मुलगा रिजवान कासरकर याला हवाला रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत ही अटक करण्यात आली.

बुधवारी रात्री मुंबई विमानतळावरून रिजवान हा देश सोडून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्या अगोदरच खंडणी विरोधी पथकाने त्यास अटक केली. याआधी दाऊदचा हस्तक फहीम मचमच याचा विश्वासू अहमद राजा वाडारीया यास हवाला प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर दाऊदच्या पुतण्याला अटक झाली आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर मुंबई पोलीस विभागातील एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे, की राजा वडारीया याच्या चौकशीत रिजवानचे नाव पुढे आले. मुंबई विमानतळावर तो येणार असून देशाबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मुंबई विमानतळावर सापळा रचला. यात रिजवान अडकला. त्याला लगेच अटक करण्यात आली.

बाप-लेकाला एकाच पोलीस अधिकाऱ्याकडून अटक

दरम्यान, इकबाल कासकर याला काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी त्याला घरात घुसून अटक केली होती. त्यामुळे आता इकबाल आणि रिजवान हे दोघेही बाप-लेक गजाआड गेले आहेत. विशेष म्हणजे रिजवान यालाही प्रदीप शर्मा यांनीच मुंबई विमानतळावरुन अटक केली आहे.

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या रिजवानची चौकशी मुंबई पोलीस केली. यानंतर, पोलिसांनी रिजवानला न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने रिजवानला २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Intro:Body:

ब्रेक- दाऊद इब्राहिम चा पुतण्या व इकबाल कासकर चा मुलगा रिजवाण याला हवाला रॅकेट संदर्भात मुंबई पोलिसांनी केली अटक

Conclusion:
Last Updated : Jul 18, 2019, 4:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.