नवी दिल्ली - लॉकडाऊन'मुळे नागरिक घरात आहेत. रस्त्यावर केवळ आवश्यक कामासाठी बाहेर निघणार्या व्यक्ती आहेत. शहरातील रस्ते पूर्णत: निर्जन झाले आहेत. याचा फायदा देशातील सर्वांत मोठी आणि धार्मिकदृष्ट्या पवित्र गंगा नदीला झाला आहे. गंगेच्या पाण्याची गुणवत्ता 50 टक्क्यांपर्यंत सुधारली आहे.
लॉकडाऊनमुळे देशातील कारखाने बंद आहेत. यामुळे गंगाच्या स्थितीत बरीच सुधारणा दिसून येत आहे. उद्योगांमुळे गंगेचे 10 टक्के प्रदुषण वाढायचे. लॉकडाऊनमुळे पाण्याची गुणवत्ता वेगाने सुधारत आहे. पूर्वीप्रमाणेच गंगा पुन्हा स्वच्छ होऊ शकते, असे आयआयटी बीएचयू केमिकल अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ पी.के मिश्रा म्हणाले.
दरम्यान लॉकडाऊनमुळे पृथ्वी आता स्थिर झाली असून पृथ्वीचे कंप कमी झाले आहेत. म्हणजेच, संपूर्ण जगात ध्वनी प्रदूषण कमी झाले आहे. सामान्य दिवसांमध्ये पृथ्वीचा थरकाप दिवसेंदिवस वाढत असे. रात्री कमी असायचा. लॉकडाऊन झाल्यापासून पूर्वी थरथर कापत नाही असा शास्त्रज्ञांना शोध लागला आहे.