ETV Bharat / bharat

गांधी १५० : सेवाग्राममधील गांधींची दहा वर्षे.. - महात्मा गांधी

वर्ध्यापासून अवघ्या काही अंतरावर सेवाग्राम आश्रम आहे. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या आयुष्याचे एक दशक इथे वास्तव्य केले. गांधीजींना त्या काळात हे स्थळ जसे असणे अपेक्षित होते, अगदी तशाच स्थितीत हे स्थळ ठेवण्याचे मोलाचे काम आज आश्रम प्रतिष्ठान करत आहे. त्यामुळे गांधीजींबद्दल जाणून घ्यायचे असल्यास, त्यांची राहणी कशी होती याबद्दल केवळ माहिती न घेता, ते अनुभवायचे असल्यास, सेवाग्रामला भेट देणे आवश्यक ठरते.

Sevagram Ashram Wardha
author img

By

Published : Oct 2, 2019, 10:50 PM IST

वर्धा - शहरापासून अवघ्या काही अंतरावर सेवाग्राम आश्रम आहे. महात्मा गांधीच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. या आश्रमाने वर्ध्याची ओळख देशालाच नव्हे तर जगाला करुन दिली. महात्मा गांधीनी दिलेला सत्य अहिंसेचे विचार आजही तंतोतंत लागू पडतात. दिडशे वर्षानंतरही गांधीचे विचार अजरामर आहेत. अशा या थोर महात्म्याला समजून घ्यायचे असेल, तर 'सेवाग्राम आश्रम' नामक विद्यापीठातील त्यांच्या जीवनातील महत्वाचा धडा वाचलाच पाहिजे.

गांधी १५० : सेवाग्राममधील गांधींची दहा वर्षे...
महात्मा गांधीनी इंग्रजांच्या विरोधात कुठलेही शस्त्र हातात न घेता, त्यांना शांततेच्या मार्गाने देश सोडण्यास भाग पाडले. हे सगळं घडत असताना बापूंनी जीवनातील सर्वाधिक काळ घालवला तो सेवाग्राम आश्रमात. ३०० एकरात वसलेला हा आश्रम आजही जशाचा तसाच आहे. सेवाग्राम आश्रमामध्ये मनाला शांतीचा अनुभव येतो. ऊर्जा देणारे पावन स्थळ म्हणूनही सेवाग्रामकडे पाहिले जाते. दांडी यात्रेमुळे गांधीजींना अटक झाली. त्यांनतर हरिजन यात्राही पूर्ण झाली. महात्मा गांधींचे मानसपुत्र जमनालाल बजाज यांच्या आग्रहावरून ते वर्ध्यातील 'सत्याग्रही आश्रम' म्हणजे, आजच्या महिला आश्रमात राहिले. जानेवारी १९३५ मध्ये त्यांनी मगनवाडीत आपला मुक्काम हलवला. याच काळात 'मिस स्लेड' उर्फ 'मीरा बेन' यांना बापूंनी आश्रमासाठी शांत जागेची निवड करण्याची जबाबदारी दिली होती. मीरा बेन यांनीच सेवाग्रामची निवड केल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा : गांधी@१५० : ईटीव्ही भारतचे विशेष गीत; पंतप्रधानांसह इतर मान्यवरांकडून कौतुक

आद्य आदी निवास...
३० एप्रिल १९३६ मध्ये पहिल्यांदा महात्मा गांधी सेवाग्राम आश्रमात आले. यापूर्वी ते १७ एप्रिलला सेवाग्राम म्हणजे सेगावला गावातील लोकांना भेटले. ३० एप्रिलला येथे आले असताना राहण्यासाठी कुटी नसल्याने गांधीजी 'आद्य आदी निवास' म्हणजे तत्कालीन पेरुची बाग आणि एक विहीरीजवळ असलेल्या झोपडीत राहिले. साधारण पाच दिवस गांधीजी या झोपडीत राहीले.

आदी निवास...
जमनालाल बजाज यांना सांगून गांधीजींनी कुटी बांधण्यास संगीतले. ही कुटी एकदम सामान्य असावी. तिला १०० रुपयांपेक्षा जास्त खर्च लागू नये; आसपासच्या गावातील संसाधनांचा उपयोग करून आणि स्थानिक मजुरांच्या हाताने कुटी बांधावी; असे सांगून गांधी ५ मे १९३६ला खादी यात्रेकरिता निघून गेले. यानंतर १६ जून १९३६ मध्ये गांधीजी परत आले. तेव्हा आदी निवास तयार झाले होते. हे आदी निवास मीरा बेन आणि बलवंत सिंघ आणि गावकऱ्यांच्या मदतीने दीड महिन्यात तयार करण्यात आले होते. याच्या बांधकामासाठी ४९९ रुपये खर्च आला होता. बापूंना हे कळल्यावर ते नाराज झाले होते. मात्र, जमनालाल बजाज हे त्यांची समजूत काढण्यास यशस्वी ठरले.

या कुटीला बापूंच्या मृत्यूनंतर 'आदी निवास' असे नाव देण्यात आले. याच निवासात बापूंची तुकडोजी महाराज, खान अब्दुल गफ्फार खान, गांधींजींचे सेक्रेटरी प्यारेलाल, नेहरू, पटेल यांसह देशातील अनेक व्यक्ती त्यांना भेटून गेले. १९४२च्या 'चले जाव' नाऱ्याची पायाभरणीही याच कुटीतील बैठकीत झाली होती.

बापू कुटी...
यानंतर, दीड वर्षांनी १९३७च्या शेवटी मिराबेन राहत असलेल्या कुटीत बापू राहायला गेले. त्याच कुटीला 'बापू कुटी' म्हणून आज ओळखले जाते. सुरुवातीला लहान असलेली ही कुटी, बापू रहायला गेल्यानंतर मोठी करण्यात आली. यात स्नानगृह, औषध उपचार केंद्र बांधण्यात आले. या ठिकाणी अनेक बैठका होत. अनेक लोक बापुंना भेटायला येत. या ठिकाणी बापू ८ वर्ष राहिले होते.

बा कुटी...
जमानाला बजाज हे कस्तुरबांना आईच्या स्थानी मानत होते. 'बा' कस्तुरबा यांना अडचण होत असल्याने त्यांच्यासाठी 'बा कुटी' तयार करून दिली. कालांतराने महिला भगिनी आल्यास त्या बां सोबत याच कुटीत रहायच्या.

आखरी निवास...
बा कुटीच्या जवळच जमनालाल बजाज यांनी स्वतःसाठी कुटी बांधून घेतली होती, पण ते त्यात राहू शकले नाहीत. बापूंचे मुख्य सचीव महादेवभाई हेही इथेच सहकुटुंब राहिले. तसेच सुशीला नायर यांनी याच झोपडीत रोग्यांवर उपचार केले. आज सेवाग्राममध्ये 'कस्तुरबा हेल्थ सोसायटी'च्या भव्य दवाखान्याचा पाया याच कुटीतून रोवला गेला.

हेही वाचा : गांधी @150 : रामोजी राव यांच्या हस्ते बापूंच्या प्रिय भजनाचे लोकार्पण

आश्रमाच्या तीनशे एकर परिसरात मुख्य सचिव महादेवभाई यांची 'महादेव कुटी' आहे. महादेव भाई जेलमध्ये असतांना किशोरलाल भाई यांच्यासाठी किशोर निवास बांधण्यात आला होता. आज येथूनच सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे काम चालते. परचुरे शास्त्री यांना कुष्ठरोग झाला असताना त्यांच्यासाठी 'परचुरे कुटी' तयार करण्यात आली होती. आश्रमात येणाऱ्या पाहुण्यांची गर्दी पाहता आजच्या नई तालीम परिसरात हे रुस्तम भवन बांधण्यात आले होते. असे अनेक बांधकाम गरजेनुसार होत गेले. यातूनच, आज याचा मोठा विस्तार झाला आहे.

या पावन भूमीला भेट देऊन लोक गांधींना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. शांततेची अनुभूती, वृक्षांची सावली. गांधी विचारांची साधी राहणी असे बरेच काही येथे पाहायला मिळतात. एकदा आश्रमात आले की मन प्रसन्न होते. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतीच आश्रमला भेट दिली होती. २० मिनिटेच आश्रमामध्ये थांबण्याचे नियोजन असताना राष्ट्रपती प्रत्यक्षात मात्र बराच वेळ आश्रमामध्ये थांबले होते.

यावर्षी आपण गांधीजींची १५० वी जयंती साजरी करत आहोत. गांधीजींना ज्यापद्धतीने हे स्थळ असणे अपेक्षित होते, त्याच पद्धतीने हे स्थळ ठेवण्याचे मोलाचे काम आश्रम प्रतिष्ठान करत आहे. त्यामुळे गांधीजींबद्दल जाणून घ्यायचे असल्यास, त्यांची राहणी कशी होती याबद्दल केवळ माहिती न घेता, ते अनुभवायचे असल्यास, सेवाग्रामला भेट देणे आवश्यक ठरते.

हेही वाचा : गांधी@150; ईटीव्ही भारतच्या माध्यमातून देशातील सर्वश्रेष्ठ गायकांकडून बापूंना संगीतमय श्रद्धांजली

Intro:Body:

गांधी १५० : सेवाग्राममधील गांधींची दहा वर्षे...

वर्ध्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या सेवाग्राम आश्रम आहे. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या आयुष्याचे एक दशक इथे वास्तव्य केले. गांधीजींना त्या काळात हे स्थळ जसे असणे अपेक्षित होते, अगदी तशाच स्थितीत हे स्थळ ठेवण्याचे मोलाचे काम आज आश्रम प्रतिष्ठान करत आहे. त्यामुळे गांधीजींबद्दल जाणून घ्यायचे असल्यास, त्यांची राहणी कशी होती याबद्दल केवळ माहिती न घेता, ते अनुभवायचे असल्यास, सेवाग्रामला भेट देणे आवश्यक ठरते.

वर्धा - शहरापासून अवघ्या काही अंतरावर सेवाग्राम आश्रम आहे. महात्मा गांधीच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. या आश्रमाने वर्ध्याची ओळख देशालाच नव्हे तर जगाला करुन दिली. महात्मा गांधीनी दिलेला सत्य अहिंसेचे विचार आजही तंतोतंत लागू पडतात. दिडशे वर्षानंतरही गांधीचे विचार अजरामर आहेत. अशा या थोर महात्म्याला समजून घ्यायचे असेल, तर 'सेवाग्राम आश्रम' नामक विद्यापीठातील त्यांच्या जीवनातील महत्वाचा धडा वाचलाच पाहिजे.

महात्मा गांधीनी इंग्रजांच्या विरोधात कुठलेही शस्त्र हातात न घेता, त्यांना शांततेच्या मार्गाने देश सोडण्यास भाग पाडले. हे सगळं घडत असताना बापूंनी जीवनातील सर्वाधिक काळ घालवला तो सेवाग्राम आश्रमात. ३०० एकरात वसलेला हा आश्रम आजही जशाचा तसाच आहे. सेवाग्राम आश्रमामध्ये मनाला शांतीचा अनुभव येतो. ऊर्जा देणारे पावन स्थळ म्हणूनही सेवाग्रामकडे पाहिले जाते.

दांडी यात्रेमुळे गांधीजींना अटक झाली. त्यांनतर हरिजन यात्राही पूर्ण झाली. महात्मा गांधींचे मानसपुत्र जमनालाल बजाज यांच्या आग्रहावरून ते वर्ध्यातील 'सत्याग्रही आश्रम' म्हणजे, आजच्या महिला आश्रमात राहिले. जानेवारी १९३५ मध्ये त्यांनी मगनवाडीत आपला मुक्काम हलवला. याच काळात 'मिस स्लेड' उर्फ 'मीरा बेन' यांना बापूंनी आश्रमासाठी शांत जागेची निवड करण्याची जबाबदारी दिली होती. मीरा बेन यांनीच सेवाग्रामची निवड केल्याचे सांगितले जाते.

आद्य आदी निवास...

३० एप्रिल १९३६ मध्ये पहिल्यांदा महात्मा गांधी सेवाग्राम आश्रमात आले. यापूर्वी ते १७ एप्रिलला सेवाग्राम म्हणजे सेगावला गावातील लोकांना भेटले. ३० एप्रिलला येथे आले असताना राहण्यासाठी कुटी नसल्याने गांधीजी 'आद्य आदी निवास' म्हणजे तत्कालीन पेरुची बाग आणि एक विहीरीजवळ असलेल्या झोपडीत राहिले. साधारण पाच दिवस गांधीजी या झोपडीत राहीले.

आदी निवास...

जमनालाल बजाज यांना सांगून गांधीजींनी कुटी बांधण्यास संगीतले. ही कुटी एकदम सामान्य असावी. तिला १०० रुपयांपेक्षा जास्त खर्च लागू नये; आसपासच्या गावातील संसाधनांचा उपयोग करून आणि स्थानिक मजुरांच्या हाताने कुटी बांधावी; असे सांगून गांधी ५ मे १९३६ला खादी यात्रेकरिता निघून गेले. यानंतर १६ जून १९३६ मध्ये गांधीजी परत आले. तेव्हा आदी निवास तयार झाले होते. हे आदी निवास मीरा बेन आणि बलवंत सिंघ आणि गावकऱ्यांच्या मदतीने दीड महिन्यात तयार करण्यात आले होते. याच्या बांधकामासाठी ४९९ रुपये खर्च आला होता. बापूंना हे कळल्यावर ते नाराज झाले होते. मात्र, जमनालाल बजाज हे त्यांची समजूत काढण्यास यशस्वी ठरले.

या कुटीला बापूंच्या मृत्यूनंतर 'आदी निवास' असे नाव देण्यात आले. याच निवासात बापूंची तुकडोजी महाराज, खान अब्दुल गफ्फार खान, गांधींजींचे सेक्रेटरी प्यारेलाल, नेहरू, पटेल यांसह देशातील अनेक व्यक्ती त्यांना भेटून गेले. १९४२च्या 'चले जाव' नाऱ्याची पायाभरणीही याच कुटीतील बैठकीत झाली होती.

बापू कुटी...

यानंतर, दीड वर्षांनी १९३७च्या शेवटी मिराबेन राहत असलेल्या कुटीत बापू राहायला गेले. त्याच कुटीला 'बापू कुटी' म्हणून आज ओळखले जाते. सुरुवातीला लहान असलेली ही कुटी, बापू रहायला गेल्यानंतर मोठी करण्यात आली. यात स्नानगृह, औषध उपचार केंद्र बांधण्यात आले. या ठिकाणी अनेक बैठका होत. अनेक लोक बापुंना भेटायला येत. या ठिकाणी बापू ८ वर्ष राहिले होते.

बा कुटी...

जमानाला बजाज हे कस्तुरबांना आईच्या स्थानी मानत होते. 'बा' कस्तुरबा यांना अडचण होत असल्याने त्यांच्यासाठी 'बा कुटी' तयार करून दिली. कालांतराने महिला भगिनी आल्यास त्या बां सोबत याच कुटीत रहायच्या.

आखरी निवास...

बा कुटीच्या जवळच जमनालाल बजाज यांनी स्वतःसाठी कुटी बांधून घेतली होती, पण ते त्यात राहू शकले नाहीत. बापूंचे मुख्य सचीव महादेवभाई हेही इथेच सहकुटुंब राहिले. तसेच सुशीला नायर यांनी याच झोपडीत रोग्यांवर उपचार केले. आज सेवाग्राममध्ये 'कस्तुरबा हेल्थ सोसायटी'च्या भव्य दवाखान्याचा पाया याच कुटीतून रोवला गेला.

आश्रमाच्या तीनशे एकर परिसरात मुख्य सचिव महादेवभाई यांची 'महादेव कुटी' आहे. महादेव भाई जेलमध्ये असतांना किशोरलाल भाई यांच्यासाठी किशोर निवास बांधण्यात आला होता. आज येथूनच सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे काम चालते. परचुरे शास्त्री यांना कुष्ठरोग झाला असताना त्यांच्यासाठी 'परचुरे कुटी' तयार करण्यात आली होती. आश्रमात येणाऱ्या पाहुण्यांची गर्दी पाहता आजच्या नई तालीम परिसरात हे रुस्तम भवन बांधण्यात आले होते. असे अनेक बांधकाम गरजेनुसार होत गेले. यातूनच, आज याचा मोठा विस्तार झाला आहे.

या पावन भूमीला भेट देऊन लोक गांधींना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. शांततेची अनुभूती, वृक्षांची सावली. गांधी विचारांची साधी राहणी असे बरेच काही येथे पाहायला मिळतात. एकदा आश्रमात आले की मन प्रसन्न होते. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतीच आश्रमला भेट दिली होती. २० मिनिटेच आश्रमामध्ये थांबण्याचे नियोजन असताना राष्ट्रपती प्रत्यक्षात मात्र बराच वेळ आश्रमामध्ये थांबले होते.

यावर्षी आपण गांधीजींची १५० वी जयंती साजरी करत आहोत. गांधीजींना ज्यापद्धतीने हे स्थळ असणे अपेक्षित होते, त्याच पद्धतीने हे स्थळ ठेवण्याचे मोलाचे काम आश्रम प्रतिष्ठान करत आहे. त्यामुळे गांधीजींबद्दल जाणून घ्यायचे असल्यास, त्यांची राहणी कशी होती याबद्दल केवळ माहिती न घेता, ते अनुभवायचे असल्यास, सेवाग्रामला भेट देणे आवश्यक ठरते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.