नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी एका पोर्टलचे उद्घाटन केले. एमएसएमई सेक्टरबाबत नवीन आणि सर्जनशील कल्पना या पोर्टलवर अपलोड करता येणार आहेत. 'MSME Bank of Ideas, Innovation and Research' असे या पोर्टलचे नाव असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.
पोर्टलवर रजिस्टर करणे गरजेचे असणार आहे. वापरकर्ते नवनवीन कल्पना, रिसर्च यावर अपलोड करू शकतील. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून याची पडताळणी होईल आणि त्यानंतर सर्व सुचना, नवीन आयडिया लोकांसमोर मांडल्या जातील.
महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळासोबत चर्चा केल्यानंतर गडकरी यांनी सांगितले की, चीनमधून निर्यात कराव्या लागणाऱ्या वस्तू स्थानिक पातळीवर उत्पादित करण्याची क्षमता निर्माण करणे सुरू आहे.
सध्या आपली निर्यातक्षमता वाढवण्याची भारतासमोर मोठी संधी आहे. यामुळे परदेशी गुंतवणुकीलाही चालना मिळेल, असेही गडकरी म्हणाले.