ETV Bharat / bharat

'स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020': 'सोहळ्यात 21 व्या शतकातल्या युवकांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब दिसले'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 'स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020' च्या अंतिम फेरी सोहळ्याला व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Aug 2, 2020, 7:54 AM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 'स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020' च्या अंतिम फेरी सोहळ्याला व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. या सोहळ्यात 21 व्या शतकातल्या युवकांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब पाहायला मिळाले, असे मोदी म्हणाले. तसेच देशाच्या देशाचे नवीन शैक्षणिक धोरणावर त्यांनी भाष्य केले. बिहार-आसाममधील पूर परिस्थिती लक्षात घेता, पूर नियंत्रणासाठी एखादे तंत्र विकसित केले तर ते एक मोठे यश असेल, असेही मोदी म्हणाले.

परिवर्तनात्मक सुधारणा हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट, रोजगार मिळवणारे निर्माण करण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे घडवण्यावर भर द्यावा. सन 2035 पर्यंत देशात उच्च शिक्षणासाठी एकूण पटनोंदणीच्या प्रमाणामध्ये 50 टक्के वाढ व्हावी, असे धोरणाचे ध्येय निश्चित करण्यात आल्याचे मोदींनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंद्रिय बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्स बनवण्यासाठी कार्य करणाऱ्या एका मुलीशी संवाद साधला. सरकार जन औषधी केंद्रांमध्ये 1 रुपयात महिलांच्या आरोग्यासाठी उपलब्ध करत आहे. तुम्ही तयार करत असलेले सेंद्रिय बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्स हे महिलांसाठी मदतपूर्ण ठरतील, असे मोदी तीला म्हणाले. तसेत त्यांनी विचारपूर्ण कार्य केल्याबद्दल तिचे अभिनंदन केले.

मोदींनी फेसिअल रिकग्निशनचे यंत्राचा शोध लावणाऱया एमएलआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी यंत्राबद्दल विद्यार्थांने माहिती दिली की, जर एखाद्या व्यक्तीने आपला चेहरा जरी झाकला असली, तरी हे यंत्र फक्त दोन्ही डोळ्यातील अंतरावरून चेहरा ओळखू शकतो. त्यावर या यंत्राची पोलिसांना योग्य मदत होईल, असे मोदी म्हणाले.

दरम्यान, 3 ऑगस्टपर्यंत चालणारा हा हॅकेथॉन जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. देशभरातील विविध सरकारी यंत्रणा आणि खासगी कंपन्यांनी दिलेल्या 243 समस्यांवर देशभरातील 10 हजार विद्यार्थी उत्तर शोधणार आहेत. मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे चौथ्यांदा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या हॅकेथॉनमध्ये दैनंदिन आयुष्यात सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या अडचणींवर उपाय सुचवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं जातं.

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हे सर्वप्रथम 2017 मध्ये आयोजित करण्यात आले होतं. यावेळी 42 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर दुसऱ्यावर्षी म्हणजेच 2018 मध्ये विद्यार्थ्यांची संख्या ही 1 लाखांवर पोहोचली होती. त्यानंतर 2019 साली विद्यार्थ्यांची संख्या वाढून 2 लाखांवर पोहोचली होती. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020 च्या पहिल्या फेरीत 4 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.