लखनौ - उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात चार विदेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली. अटक केलेले चारही जण म्यानमारचे रहिवासी असून हे सर्व बनावट कागदपत्रे तयार करून मदरशामध्ये विद्यार्थी म्हणून वास्तव्य करत होते. यातील एकाने देशातील रहिवाशी अल्याचे कागदपत्रे तयार केली होती. दरम्यान, या घुसखोरांना मदत केल्याप्रकरणी पोलीस सध्या दोन मदरसा चालकांचा शोध घेत आहेत. या सर्व सहा आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशाच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेची पोल खोलणारे हे प्रकरण शामली जिल्ह्यातील जलालाबाद शहरातील आहे. येथे पोलिसांना परदेशी नागरिक असल्याची माहिती मिळाली होती. जिल्ह्यातील लिऊ युनिटने स्थानिक पोलिसांसह जलालाबादमधील कॉलनीतील घरावर छापा टाकला. येथून म्यानमारचे रहिवासी अब्दुल माजिद आणि नोमन अली यांना पोलिसांनी अटक केली. या दोघांच्या चौकशीनंतर मदरसा मुफ्ताउल उलूम जलालाबाद येथे छापा टाकण्यात आला. तेथे म्यानमारचा मोहम्मद रिझवान खान आणि फुरकान हुसेन यांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी त्यांच्याकडून तीन पासपोर्ट, तीन यूएन निर्वासित प्रमानपत्र, 8030 भारतीय रुपये, म्यानमारच्या चार नोटा, दोन आधार कार्ड, दोन बँक पास बुक , एक पॅनकार्ड, तीन पासपोर्ट, दोन एटीएम जप्त केले असुन आरोपींविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम कलम 420, 467, 468, 471 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.