ETV Bharat / bharat

वाढदिवस विशेष : मनमोहन सिंगांचे वयाच्या 87 व्या वर्षात पदार्पण, देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव - नेत्यांनी सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

जगाच्या नकाशावर आर्थिक महाशक्ती म्हणून देशाला मानाचे स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज 87 वा वाढदिवस आहे.

वाढदिवस विशेष : मनमोहन सिंगाचे वयाच्या 87 वर्षात पदार्पण, देशभरातून शुभेच्छाचा वर्षाव
author img

By

Published : Sep 26, 2019, 1:03 PM IST

नवी दिल्ली - जगाच्या नकाशावर आर्थिक महाशक्ती म्हणून देशाला मानाचे स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज 87 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीसह विविध नेत्यांनी सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • Best wishes to our former Prime Minister Dr. Manmohan Singh Ji on his birthday. I pray for his long and healthy life.

    — Narendra Modi (@narendramodi) September 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेसने आपल्या अधिकृत टि्वटर खात्यावरून व्हिडिओच्या माध्यमातून मनमोहन सिंग यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

  • As we celebrate Former PM Dr. Manmohan Singh, we look back at some of his greatest achievements. He has served our country for several decades & continues to do so with his renowned intelligence, humility & dedication. #HappyBirthdayDrSingh pic.twitter.com/AmRe39fc8s

    — Congress (@INCIndia) September 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

डॉ.मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी झाला होता. मनमोहन सिंगांच्या वडिलांचे नाव गुरुमुखसिंग आणि आईचे नाव अमृतकौर आहे. 1947 ला भारत-पाकिस्तान फाळणीवेळी मनमोहन सिंग यांचे कुटुंब अमृतसर येथे आले होते.

28 वर्षांची प्रदीर्घ राजकीय कारकिर्द -
डॉ. मनमोहन सिंग यांची 28 वर्षांची प्रदीर्घ राजकीय कारकिर्द राहिली आहे. 1991 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी डॉ. मनमोहन सिंग यांचा आपल्या मंत्रिमंडळात थेट अर्थमंत्री म्हणून समावेश केला होता. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली होती. मनमोहन सिंग हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. नम्र आणि शांत स्वभावाचे मनमोहन सिंग 2004 ते 2014 असे दहा वर्ष भारताचे पंतप्रधान होते. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर सलग दहा वर्षे पंतप्रधानपदाचा मान मिळालेले ते तिसरे पंतप्रधान आहेत.

former Prime Minister Manmohan Singh's birthday today
डॉ. मनमोहन सिंग यांची 28 वर्षांची प्रदीर्घ राजकीय कारकिर्द राहिली आहे.

मनमोहन सिंह यांचा जीवनक्रम -

  • सन 1957 ते 1965 - चंदिगडमधील पंजाब विश्वविद्यालयात प्राध्यापक
  • इ.स. 1969-1971 - दिल्ली स्कूल ऑफ इकाॅनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक
  • इ.स. 1976 - दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात मानद प्राध्यापक.
  • इ.स. 1982 से 1985 - भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर.
  • इ.स. 1985 से 1987 – भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष.
  • इ.स. 1990 से 1991 - भारतीय पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार.
  • इ.स. 1991 - नरसिंह राव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री.
  • इ.स. 1991 – आसाममधून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले.
  • इ.स. 1995 – दुसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य
  • इ.स. 1996 - दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक
  • इ.स. 1999 - दक्षिण दिल्लीमधून लोकसभा निवडणूक लढले पण त्यात हरले.
  • इ.स. 2001 – तिसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य आणि विरोधी पक्ष नेता
  • इ.स. 2004 – भारताचे पंतप्रधान
  • इ.स. 2014 - भारताचे दुसऱ्यांदा पंतप्रधान

    डॉ. मनमोहन सिंग यांचा आज 87 वा वाढदिवस आहे.

दि ॲक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर या चित्रपटात अनुपम खेर यांनी मनमोहनसिंगांची भूमिका केली आहे. या सिनेमात काँग्रेसवर आणि गांधी घराण्यावर टीका केलेली असल्याने या सिनेमाच्या प्रदर्शनाला काँग्रेस पक्षाने विरोध केला होता. काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांनी या सिनेमाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता, परंतु 11 जानेवारी 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.