ETV Bharat / bharat

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी कोमात, डॉक्टरांनी दिली माहिती

शनिवारी प्रकृती ढासळल्यानंतर त्यांना रायपूरच्या नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून ते अस्वस्थ आहेत.

ajit jogi in coma
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी कोमात
author img

By

Published : May 10, 2020, 11:59 AM IST

रायपूर - छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. अजित जोगी कोमात गेल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी सांगितले. शनिवारी प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील ४८ तास त्यांच्यावर कायम देखरेख ठेवण्यात येणार आहे.

शनिवारी प्रकृती ढासळल्यानंतर त्यांना रायपूरच्या नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून ते अस्वस्थ आहेत. आज त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली आहे.

ajit jogi in coma
रुग्णालयाने जाहीर केलेल पत्रक

अजित जोगी हे छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री आहेत. मध्य प्रदेश पुनर्गठन अधिनियम २००० अंतर्गत १ नोव्हेंबरला २००० ला मध्यप्रदेशातून विलग होऊन छत्तीसगड राज्य अस्तित्वात आले होते. त्यानंतर झालेल्या निवडणूकांमध्ये अजित जोगी काँग्रेस पक्षातून निवडून आले होते.

पेशाने इंजिनिअर आहेत जोगी -

अजित जोगी हे पेशाने इंजिनिअर आहेत. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना भोपाळ विद्यापीठाचे सुवर्ण पदक पटकावले होते. तर, एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकवताना भारतीय पोलीस अधिकारी (आयपीएस) म्हणून निवड झाली होती. छत्तीसगडमध्ये सिरसा समुदायाचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा होता. त्यांच्या पाठिंब्यावरच ते मुख्यमंत्री विराजमान झाले होते.

मागच्या वर्षी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी बसपशी आघाडी केली होती. त्यामध्ये त्यांना पाहिजे तेवढे यश मिळाले नाही. मात्र, छत्तीसगडच्या राजकारणात त्यांनी आपली छाप सोडली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.