ETV Bharat / bharat

आसाममध्ये महापुरामुळे आणखी 7 जणांचा मृत्यू; 15 लाख लोकांना पुराचा फटका

मंगळवार पर्यंत राज्यातील 33 जिल्ह्यात पैकी 23 जिल्ह्यांमधील 14.94 लाख लोकांना पुराचा फटका बसला होता. बुधवारी ही संख्या वाढून 14. 95 लाख वर गेली.पुरामुळे आतापर्यंत 33 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Flood in Assam
आसाममधील पूरस्थिती
author img

By

Published : Jul 2, 2020, 7:27 AM IST

Updated : Jul 2, 2020, 8:00 AM IST

गुवाहटी (आसाम)- राज्यातील पूर परिस्थितीमुळे आणखी सात जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 15 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. महापुरामुळे रस्ते, पूल आणि इतर इमारतींचे नुकसान झाले आहे, असे सरकारच्या वतीने बुधवारी सांगण्यात आले. आतापर्यंत एकूण 33 लोकांचा मृत्यू झालाय तर 24 ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

बारपेटा जिल्ह्यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला. दुबरी नागाव नलबारी या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती मुळे झालेल्या घटनांमध्ये हे तिघांचा मृत्यू झाला. काचार जिल्ह्यात दरड कोसळून पन्नास वर्षे व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे. गुवाहटी निमती घाट जोरात तेझपूर सोनितपूर गोलपारा डुबरी येथून ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.

मंगळवार पर्यंत राज्यातील 33 जिल्ह्यात पैकी 23 जिल्ह्यांमधील 14.94 लाख लोकांना पुराचा फटका बसला होता. बुधवारी ही संख्या वाढून 14. 95 लाख वर गेली.

पुराचे पाणी माजुली, पश्चिम कर्बी अंगलॉंग या जिल्ह्यातून ओसरले आहे. मात्र, ढेमजी, लखमीपूर, बिस्वनाथ, चिरांग, दरंग, नलबारी, बारपेटा, बोंगागांव, धुबरी, दक्षिण साल्मारा, गोलपारा, कामरूप, मोरीगाव, होजाई, नागाव, गोलाघाट, जोरहाट, शिवसागर, दिब्रूगड आणि तीनसुकिया हे जिल्हे अजूनही पाण्याखाली गेले आहेत.

बारपेटाला महापुराचा जोरदार फटका बसलेला आहे. 5.95 लाख लोक पूरग्रस्त झाले आहेत. दक्षिण सालमारा जिल्ह्यातील 1.95 लाख आणि गोलपारा येथील 94 हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे.

जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने या तीन जिल्ह्यातील 4221 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. सध्या 2197 गावामध्ये महापुराचे पाणी साचले असून 87,018.17 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे आसाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले.निवारागृहात 15,289 नागरिक वास्तव्यास असून 254 आपत्ती मदत केंद्रे 15 जिल्ह्यात सुरु आहेत.

गोलाघाटातील नुमालीगड येथील ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी धनुरी, सोनीतपूरमधील एनटी रोड क्रॉसिंग येथील जिया भारली नदी आणि नागगावमधील कामपूर येथील कोपली नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे.

दिब्रूगड, बक्सा, नागाव, बारपेटा, दरंग, नलबरी, गोलापाडा, बोंगागाव, धुबरी, मोरीगाव, माजुली, शिवसागर आणि कोकराझार जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्ते, पूल आणि इतर अनेक पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.

बडसा जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूकंप झाल्याचे एएसडीएमएने सांगितले.

Last Updated : Jul 2, 2020, 8:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.