ETV Bharat / bharat

RAIN UPDATE : केरळ, कर्नाटकसह देशातील ५ राज्यांमध्ये पूराचे थैमान, बचावकार्य सुरु

जोरदार पावसामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पूर आला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड राज्याला पावसाने झोडपून काढले आहे. या राज्यांमध्ये आपत्ती निवारण दलाचे पथक, हवाई दल आणि स्थानिक प्रशासन मदत करत आहे.

पुराचे थैमान
author img

By

Published : Aug 9, 2019, 11:57 AM IST

Updated : Aug 9, 2019, 1:28 PM IST

नवी दिल्ली - जोरदार पावसामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पूर आला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड राज्याला पावसाने झोडपून काढले आहे. या राज्यांमध्ये आपत्ती निवारण दलाचे पथक, हवाई दल आणि स्थानिक प्रशासन मदत करत आहे. पुरामध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रात २७, केरळमध्ये २९ आणि कर्नाटकात ९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

केरळमधील पूरपरिस्थिती

RAIN UPDATE -

  • केरळ - भारतीय लष्कराचे विमानतळ आयएनएस गरुडा नागरी विमान वापरासाठी खुले. कोची विमानतळ पाण्याखाली गेल्याने घेतला निर्णय.
  • केरळ - ३१५ मदत केंद्रामध्ये २२ हजारापेक्षा जास्त लोकांनी आश्रय घेतला आहे.
  • नवी दिल्ली - देशभरातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृह मंत्रालयाची महत्त्वाची बैठक सुरु
  • कर्नाटका - घटप्रभा आणि मलप्रभा नद्यांच्या पुरपस्थितीची मुख्यमंत्री बी. एस येडीयुरप्पांनी हवाई पाहणी केली.
  • केरळ - भारताप्पुझा नदीला पूर आल्याने पत्तंबी पूलावर पाणी. वाहतूक बंद.
  • केरळ: एर्नाकुलम जिल्ह्यातील मुवत्तुपुझा गावामध्ये पाणी शिरले. संपूर्ण परिसरामध्ये साचले पाणी.
  • कर्नाटक : पुरामुळे एअर इंडियाच्या ६ विमानांची उड्डाणे थांबवण्यात आली. वेळापत्रकात बदल करण्यात आल्याने दिरंगाई.
  • उत्तराखंड - चिमोली जिल्ह्यातील देवाल भागात मुसळधार पाऊस. एक महिला आणि लहान बालकाचा मृत्यू. आपत्ती निवारण पथक घटनास्थळी दाखल.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत २ लाखपर्यंत नागरिकांना विस्थापित केले आहे. केरळमधील वायनाड जिल्ह्यामध्ये दरड कोसळली. या घटनेत ५४ जणांना वाचवण्यात आले आहे. कोची शहरामध्ये पाणी शिरले आहे. पूरात अडकलेल्यांना हवाई दल मदत करत आहे. हवाई मार्गाने अन्न आणि पाणी काही ठिकाणी पुरवण्यात येत आहे. बोटींद्वारे लोकांना बचाव पथक सुरक्षित स्थळी हलवत आहे.

प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरु आहे. केरळमध्ये २० हजारांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ३१५ मदत केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. आत्तापर्यंत १०० लोकांना पुराच्या पाण्यातून वाचवण्यात आले आहे. कोझीकोड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे.

कर्नाटकातही पुराने थैमान घातले आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये हवाई दलातर्फे बचावकार्य सुरु आहे. छत्तीसगड मधील बिजापूर जिल्ह्यामध्ये १५ लोकांना पूराच्या पाण्यातून वाचवण्यात आले आहे. कोची विमान तळावर पाणी साठल्याने विमान सेवा रविवारपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 9, 2019, 1:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.