रांची - एका अर्भकाचा मृतदेह रुग्णालयाच्या शवागृहाबाहेर तसाच पडला होता, आणि काही कावळे त्या मृतदेहाला कुरतडत होते. हा संतापजनक प्रकार घडला आहे, झारखंडच्या पलामू वैद्यकीय महाविद्यालयात.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी एनसीयू वॉर्डमध्ये या अर्भकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, त्याचे कुटुंबीय त्याचा मृतदेह तिथेच झुडुपांमध्ये सोडून निघून गेले होते. रुग्णालय प्रशासनाला या गोष्टीची माहिती मिळताच त्यांनी एका कर्मचाऱ्याला तो मृतदेह शवागृहात नेण्यास सांगितले, मात्र त्यानेही तो शवागृहाच्या बाजूलाच टाकून दिला.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणाचा हा कळस असल्याची चर्चा परिसरात होती. नंतर या प्रकाराची माहिती मिळताच मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी लागलीच धाव घेत या अर्भकाच्या मृतदेहाला झाकून ठेवले. मात्र, या घटनेमुळे रुग्णालयाचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे.
हेही वाचा : बिहारमध्ये पुन्हा मॉब लिंचिंग; अपहरणाच्या संशयातून महिलेला मारहाण करुन जिवंत जाळले