तिरुवअनंतपूरम - दुबईमध्ये अडकलेल्या १७७ भारतीयांना घेऊन एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान काल(मंगळवारी) केरळमधील कन्नूर विमानतळावर दाखल झाले. प्रवाशांमध्ये ५ बालकांचा समावेश होता. आखाती देशातून हे पहिलेच विमान कन्नूर विमानतळावर आले आहे.
हेही वाचा -
दरम्यान, तिरुवअनंतपूरम दोहा फ्लाईट रविवारी रद्द करण्यात आली होती. हे विमान आज १८१ प्रवाशांसह तिरुअनंतपूरम विमानतळावर येणार आहे. प्रत्येक विमानतळावर थर्मल डिटेक्शन यंत्र ठेवण्यात आले आहे. सर्व प्रवाशांची तपासणी करुनच सोडण्यात येत आहे. प्रवाशांना १४ दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.
दुसरा टप्पा १६ मे पासून सुरू
'वंदे भारत मिशन'चा दुसरा टप्पा १६ मे ते २२ मे दरम्यान राबविला जाणार आहे. एअर इंडियाच्या १४९ फ्लाईटद्वारे ३१ देशांत अडकलेल्या सुमारे १६ हजार नागरिकांना माघारी आणण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात ३१ देशांतील २५ हजार नागरिकांना परत आणण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमेरिकेतून येणारी विमाने गुरजात, कर्नाटक, दिल्ली, तेलंगाणा, ओडिशा, चंदीगड आणि केरळात उतरणार आहेत. तर युएईतून येणारी विमाने केरळ, तेलंगाणा, ओडिशा, दिल्ली, आंध्रप्रदेश आणि केरळमध्ये उतरणार आहेत, अशी माहिती ईटीव्ही भारतला मिळाली आहे.