वॉशिंगटन- अमेरिकेच्या टेक्सास येथे दोन बंदूकधाऱ्यांनी अंधाधून गोळीबार केली. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाली आहेत. ही घटना मिडलँडच्या जवळ स्थित ओडेसा भागात घडली आहे.
पोलिसांनी या बंदूकधाऱ्याला सिनर्जी चित्रपट गृहाजवळ ठार केले. हा व्यक्ती ३० वर्षाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या थरारक घटनेबाबत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी ट्विटर वर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, एफबीआई आणि कायदा प्रवर्तन यांच्याकडून या घटनेचा तपास केले जात आहे. त्याचबरोबर या घटनेची माहिती त्यांना अटॉर्नी जनरल विलियम बर यांच्याकडून मिळाली आहे. असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये सांगितले.
अशा प्रकारची घटना ऑगस्ट महिन्यात देखील घडली होती. टेक्सास आणि ओहिओ या दोन ठिकाणी गोळीबाराची घटना घडली होती. यात २९ जणांचा मृत्यू झाला होता, तर ४० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. त्यानंतर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी या घटनेच्या तपासाचे निर्देश दिले होते.